मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Samaira Trailer: 'गर्ल्स' फेम अभिनेत्री केतकी नारायणचा नवा सिनेमा; समायराचा ट्रेलर प्रदर्शित

Samaira Trailer: 'गर्ल्स' फेम अभिनेत्री केतकी नारायणचा नवा सिनेमा; समायराचा ट्रेलर प्रदर्शित

हिंदी, तमिळ सिनेमा तसेच गर्ल्स या मराठी सिनेमात काम केल्यानंतर अभिनेत्री केतकी नारायणचा आणखी एक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

    मुंबई, 16 ऑगस्ट:  गर्ल्स या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री केतकी नारायण. केतकीनं गर्ल  सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या आधी तिनं तमिळ सिनेसृष्टीत सिनेमात काम केलं. एक मराठमोळी अकोल्याची मुलगी तमिळ सिनेमात काम करते ही मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. इतकंच नाही तरी केतकीनं याआधी 83 या सिनेमातही काम केलं आहे.  गर्ल्स सिनेमात तिनं साकारलेली मगा सर्वांच्या लक्षात राहिली. गर्ल्सनंतर अभिनेत्री केतकी नारायणचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ज्याच नाव आहे 'समायरा'.  सिनेमा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आयुष्यात स्वतःच स्वतःला उलगडण किती महत्त्वाचं असतं हे या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. 'समायरा’ हा सिनेमा येत्या २६ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात अभिनेत्री केतकी  नारायणसह अंकुर राठी सतीश पूळेकर आणि रोहित कोकाटे हे कलाकारही आहेत. समायरा हे सिनेमाचं नावचं फार वेगळं असून केतकीचं सिनेमातील नावही तेच आहे.  आई-वडिलांच्या शोधात निघालेली ‘समायरा’ कशी स्वतःच स्वतःला उलगडतेय आणि तिच्या आयुष्याचे काही काळाच्या आड दडून राहिलेले रहस्य कसे शोधून काढते हे सिनेमातून पाहायला मिळणार आहे.  आजच्या नव्या पिढीला अध्यात्माचे महत्व हा सिनेमा घडवून देईल असं ट्रेलर पाहून समोर येतं. हेही वाचा -  Akshaya Deodhar and Hardeek Joshi : ठरलं! अक्षया हार्दिक 'या' चित्रपटात एकत्र झळकणार; सिनेमाचं पोस्टर रिलीज सिनेमाचं दिग्दर्शन ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केलं आहे. सिनेमाविषयी सांगताना त्यांनी म्हटलं आहे की,   ‘’समायरा हा सिनेमा म्हणजे आध्यात्माचा साज चढवून आधुनिकतेच्या रंगात रेखलेला इंद्रधनुष्याचा देखावा आहे हे म्हणणं काही वावगं ठरणार नाही.  केतकी नारायण आणि अंकुर राठी ह्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद आणि विशेष म्हणजे तरुण पिढीचा येणार उत्स्फूर्त प्रतिसाद खरंच खूप उत्तम मिळत आहे.’’ 'समायरा'ची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पानट, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली आहे. तर पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे लिहिले आहेत. ‘समायरा’ची भूमिका केतकी नारायण साकारत असून अंकुर राठी तसच सतीश पूळेकर आणि रोहित कोकाटे निर्णायक भूमिकेत आहेत.
    Published by:Minal Gurav
    First published:

    पुढील बातम्या