किंग खानच्या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या 'या' अभिनेत्री सध्या आहेत कुठे?

शाहरुखसोबत बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या दीपिका पदुकोण आणि अनुष्का शर्मा आज बॉलिवूमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जातात. पण सर्वांसाठीच शाहरुख लकी ठरलेला नाही.

News18 Lokmat | Updated On: Oct 27, 2019 08:32 AM IST

किंग खानच्या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या 'या' अभिनेत्री सध्या आहेत कुठे?

बॉलिवूड करिअरची सुरुवात एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणं प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असतं. असाच एक अभिनेता म्हणजे शाहरुख खान. शाहरुखसोबत बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या दीपिका पदुकोण आणि अनुष्का शर्मा आज बॉलिवूमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जातात. पण सर्वांसाठीच शाहरुख लकी ठरलेला नाही. बॉलिवूडमधील काही अशा अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी शाहरुखसोबत बॉलिवूड पदार्पण केलं मात्र आज त्या बॉलिवूडमध्ये कुठेही दिसत नाहीत...

2017 मध्ये शाहरुखचा बिग बजेट सिनेमा 'रईस'मधून बॉलिवूडमध्ये पदर्पण करणारी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खाननं आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र भारत-पाकिस्तानच्या तणावग्रस्त संबंधांमुळे पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली आणि यासोबत माहिराचं बॉलिवूड करिअर या सिनेमानंतर संपलं.

मराठी सिने आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील बहुचर्चित जोडी सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी श्रिया पिळगांवकरनं शाहरुखच्या 'फॅन' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर श्रिया बॉलिवूडमधून गायब झाली. काही दिवसांपूर्वी अमेझॉनची सुपरहिट वेब सीरिज मिर्जापूरच्या पहिल्या सीझनमध्ये ती दिसली होती.

2007 मध्ये आलेला सिनेमा चक 'दे इंडिया'मधून जवळपास 10 अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये पदर्पण केलं होतं त्यातल्या काही ठराविक अभिनेत्री सोडता इतर सर्व अभिनेत्री बॉलिवूडमध्ये जशा आल्या तशा अचानक गायबही झाल्या. या सिनेमातून तान्या अबरोल, आर्या मेमन, अनायथा नायर, शुभी मेहता, चित्राशी रावत, किम लालद्वाला, मेसोचोन जिमिक या अभिनेत्रींनी बॉलिवूड डेब्यू केला होता. मात्र या सिनेमानंतर त्या बॉलिवूडमधून हळूहळू गायब झाल्या.

शाहरुखच्या 2004मध्ये आलेल्या 'स्वदेस' या एकमेव सिनेमात काम करणारी अभिनेत्री गायत्री जोशी. या सिनेमानंतर गायत्रीनं हॉटेल व्यावसायिक विकास ओबेरॉयशी लग्न केलं आणि त्यानंतर आपल्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी गायत्रीनं बॉलिवूडला अलविदा केलं. याआधी ती एक सुप्रसिद्ध मॉडेल होती. तसेच ती सोनाली बेंद्रे, सुझान खान आणि ट्विंकल खन्ना यांची बेस्ट फ्रेंड आहे.

Loading...

1997 मध्ये आलेल्या परदेस सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदर्पण करणाऱ्या महिमा चौधरीला या सिनेमानं बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिनं 'दिल क्या करे', 'धडकन', 'खिलाडी 420' या सारख्या सिनेमात काम केलं मात्र महिमाची सिनेमांची निवड चुकली. जवळपास 10 सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकत दिसलेल्या महिमाचे हे सर्वच सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. 2015-16मध्ये तिनं बॉलिवूमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न केला मात्र तिचा 'चॉकलेट' हा सिनेमाही फ्लॉप ठरला.

1994मध्ये शाहरुखसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सुचित्रा कृष्णमूर्तीनं आपल्या काही अटींसोबत बॉलिवूडला अलविदा केलं. सुचित्रानं काही मोजक्या भूमिका साकारल्या. 25 वर्षांच्या बॉलिवूड कारकिर्दित तिने फक्त 8 सिनेमांमध्ये काम केलं. काही दिवसांपूर्वी आलेल्या 'रॉ'मध्ये ती दिसली होती. याशिवाय तिचं 'ड्रामा क्वीन' हे नाटक खूप गाजलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2019 08:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...