लॉकडाऊननंतर अरबाज चढणार बोहल्यावर? लग्नाविषयी गर्लफ्रेंड जॉर्जिया म्हणते...

लॉकडाऊननंतर अरबाज चढणार बोहल्यावर? लग्नाविषयी गर्लफ्रेंड जॉर्जिया म्हणते...

मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजचं जॉर्जियाला डेट करत आहे. त्यामुळे आता जॉर्जिया-अरबाजच्याही लग्नाच्या चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 एप्रिल : अभिनेता अरबाज खान आणि त्याची इटालियन गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी यांचं नातं आता कोणापासून लपलेलं नाही. मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजचं जॉर्जियाशी सूत जुळलं. मागच्या दोन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे आता मलायका-अर्जुन यांच्यासोबतच जॉर्जिया-अरबाजच्याही लग्नाच्या चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये सुरू आहेत. दरम्यान नुकत्याच झालेल्या एक मुलाखतीत  जॉर्जियालाच लॉकडाऊन नंतर तुम्ही लग्न करणार अशा चर्चा आहेत. अरबाजसोबत लग्नाचा काय प्लान आहे असा प्रश्न विचारण्यात आला आणि ती सुद्धा यावर मनमोकळेपणानं बोलली.

ई-टाइम्सला सोबत झालेल्या इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये जॉर्जियानं सांगितलं की अरबाजसोबतच लग्नाच्या सुरू असलेल्या चर्चांमुळे मला काहीही फरक पडत नाही. या अफवा जेव्हा तुमचं नाव इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्तीशी जोडलं जातं तेव्हा आपोआपच सुरू होता. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीशी मैत्री करता त्यावेळी तुम्ही त्याची प्रसिद्धी स्वीकारणं अधिक महत्त्वाचं असतं. त्यामुळे मला या अफवांचा फार काही फरक पडत नाही. आम्ही अद्याप लग्नाचा कोणताही प्लान केलेला नाही.

रितेश देशमुख लॉकडाऊनमुळे लातूरऐवजी अडकला या ठिकाणी, Video मुळे झाला खुलासा

जॉर्जिया एकीकडे लग्नाचं वृत्त फेटाळून लावत असताना दुसरीकडे तिचं कुटुंब इटलीमध्ये खूप कठिण परिस्थितीचा सामना करत आहे. आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना जॉर्जिया म्हणाली, सर्वांची तब्बेत तर ठिक आहे. मात्र कोरोना व्हायरसनं सर्व काही संपवलं आहे. सध्या जो प्रकार इटलीमध्ये चालू आहे ते पाहता पुढचं वर्षभर तरी मी माझ्या कुटुंबाला भेटू शकत नाही. मला वाटतं जेव्हा जगातलं लॉकडाऊन संपेल तेव्हा मी जाऊन माझ्या कुटुंबाला भेटावं आणि त्यांच्यासोबत काही काळ राहावं.

फोटोमध्ये दिसणारी ही चिमुरडी आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, तुम्ही ओळखलं का?

 

View this post on Instagram

 

To your day happy happy bday rockstar @arbaazkhanofficial #happybirthday #happybdayboy #❤️

A post shared by Giorgia Andriani (@giorgia.andriani22) on

जॉर्जिया पुढे सांगते, माझं संपूर्ण कुटुंब इटलीत अडकलं असलं तरीही भारतात मला नवं कुटुंब मिळालं. कदाचित असं होऊ शकतं की, लग्नानंतर मी कायमची मुंबईमध्ये स्थायिक होईन. पण अद्याप तरी लग्नाचा कोणताही प्लान नाही. सध्या मी माझ्या कामावर लक्ष केंद्रत करत आहे. मी एक आयटम नंबर केलं आहे. जे लवकरच रिलीज होईल लॉकडाऊनमुळे त्याच्या एडिटिंगचं काम बाकी आहे. हे गाणं श्रीदेवी बंगलो सिनेमातलं आहे आणि यात प्रिया प्रकाश आणि अरबाजनं काम केलं आहे.

पाहा पाक मीडियाचं अर्धवट ज्ञान, अभिनेता आमिर खानलाच म्हटलं आरोपी

First published: April 19, 2020, 4:28 PM IST

ताज्या बातम्या