• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'मिसेस मुख्यमंत्री' आता पौराणिक भूमिकेत; तुम्ही पाहिला का हा VIDEO?

'मिसेस मुख्यमंत्री' आता पौराणिक भूमिकेत; तुम्ही पाहिला का हा VIDEO?

मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडे (amruta dhongade) एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस.

 • Share this:
  मुंबई 19 ऑक्टोबर :  आपण सर्वांनीच आपल्या लहानपणी आजीकडून किंवा आईकडून 'एक आटपाट नगर होतं तिकडे एक साधुवाणी राहत होता' या चातुर्मासाच्या गोष्टी ऐकल्या असतील, याच चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात 'घेतला वसा टाकू नको' (ghetla vasa taku nako latest episode )या कार्यक्रातून पाहायला मिळतात आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. नुकतंच प्रेक्षकांनी नवरात्री विशेष भाग अनुभवले. आता येत्या आठवड्यापासून शनीदेवांची जन्मकथा आणि शनी देव माहात्म्य प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या निमित्ताने मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडे (amruta dhongade) एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेत ती सूर्यदेव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली. ही भूमिका साकारताना आणि पुन्हा एकदा टेलिव्हिजन या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी अमृताने उत्सुकता असल्याचे तिनं सांगिकलं.
  'मिसेस मुख्यमंत्री' छोट्या पडद्यावर चांगलीच गाजली होती. मालिकेचे कथानक आणि दमदार कलाकारांची फौज यामुळे रसिकांची आवडती मालिका बनली होती. मालिकेच्या पहिल्या भागापासून रसिक मालिकेला खिळून होते. याच मालिकेतून अमृता धोंगडेला बरीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेमुळे तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. सुमीच्या भूमिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. आता परत ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाचा : Shilpa Shetty - Raj Kundra वरील आरोप Sherlyn Chopra ला महागात; कपलने दाखल केला 50 कोटींचा मानहानीचा खटला अमृता सोशल मीडियावर देखील चांगलीच अॅक्टीव असते. ती तिचे विविध फोटो तसेच व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. या मालिकेत तिचा लुक कसा आहे याचा व्हिडिओ अमृताने इन्स्टावर शेअर केला आहे. तसेच ही भूमिका साकरण्याचा अनुभव देखील चांगला असल्याचा अमृताने सांगितलं आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: