मुंबई, 03 डिसेंबर : बॉलिवूडचा प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर रेमो डिसूझावर झालेल्या फसवणूकीच्या आरोपात त्याच्या समोरील अडचणीत वाढ झाल्याचं कळतंय. हायकोर्टानं दिलेल्या आदेशानुसार आता गाझियाबाद पोलिसांनी रेमो डिसूझाचा पासपोर्ट जप्त केला आहे. रेमो डिसूझाच्या विरोधात सिहानी गेट पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
5 कोटींचा वाद
सूत्रांच्या माहितीनुसार सत्येंद्र त्यागी नावाच्या एका व्यक्तीनं रेमो डिसूझाच्या विरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. त्यागी यांचा आरोप आहे की, 2013 मध्ये त्याची रेमो डिसूझाशी ओळख झाली होती. काही दिवसांनी रेमोनं त्याचा सिनेमा ‘अमर मस्ट डाय’मध्ये 5 कोटी रुपये गुंतवण्यास सांगितलं होतं. त्यागी यांचं म्हणणं आहे की रेमोनं त्यावेळी ही रक्कम दुपटीनं परत करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्यानं मूळ रक्कमही परत केली नाही.
पैसे मागितल्यावर मिळाली धमकी
सत्येंद्र त्यागी यांनी त्यांचे पैसे परत मागितल्यावर 13 डिसेंबर 2016 मध्ये प्रसाद पुजारी नावाच्या एका व्यक्तीकडून रेमोनं त्याला धमकी दिली. या पुजारीनं स्वतः अंडरवर्डला भाघ असल्याचं सांगितलं. जर सत्येंद्रनं पुन्हा रेमोकडे पैशांची मागणी केली तर त्याला जीवे मारण्याची धमकी या व्यक्तीनं सत्येंद्र यांना दिली. त्यानंतर सत्येंद्र त्यागी यांनी गाझियाबादच्या सिहानीगेट पोलिस स्टेशनमध्ये रेमो डिसूझाच्या विरोधात तक्रार केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Remo D'soza