मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आणखी एक लोकप्रिय मराठी मालिका जाणार दुसऱ्या भाषेत; गुजराती रिमेकची तयारी

आणखी एक लोकप्रिय मराठी मालिका जाणार दुसऱ्या भाषेत; गुजराती रिमेकची तयारी

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 18 नोव्हेंबर- सध्या मराठी मालिकांची लोकप्रियता वारंवार वाढत आहे. अनेक मराठी मालिकांचे विविध भाषेत रिमेक  (remake)केले जात आहे. अशाच एका लोकप्रिय मराठी (ghadage and sun)  मालिकेचा गुजराती रिमेक केला जाणार आहे.

कलर्स मराठी वरील काही लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’ ही मालिका होय. या मालिकेतील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं.  या मालिकेचा आता गुजराती रिमेक बनणार ( ghadage and sun remake in gujrathi) असल्याचं समोर येत आहे. ‘मोटी मा नी नानी वहु’ असं या मालिकेचं नाव आहे. marathiserials या इन्स्टा पेजने याबद्दल माहिती दिली आहे. या मालिकेच्या रिमेकमध्ये रोहिणी हट्टंगडीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समोर येत आहे.

वाचा : थुकरट वाडीत हजेरी लावणार बॉलिवूडमधील हे क्यूट कपल

‘घाडगे अ‍ॅण्ड सून’. मालिकेतील सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांना आपलंस केलं होतं. उत्तम कथानक, कलाकार यांमुळं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले होते. घाडगे सदन आणि त्यातलं कुटुंब हे प्रेक्षकांना आपल्या कुटुंबाचा एक भाग वाटत होतं. घाडगे सदनमधील माई, अण्णा, अक्का, अक्षय , अमृता आणि कियारा ही या मालिकेतली मुख्य पात्रं. अक्षय-अमृताची केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा झाली. समंजस, विचारी माईच्या भूमिका देखील प्रेक्षकांना आवडली. तर कियारा आणि वसुधा या दोघीही खलनायिकेच्या भूमिकेत उत्तम दिसल्या.

यापूर्वी स्टार प्रवाहवरील आई कुठं काय करते या मालिकेचा देखील हिंदी रिमेक करण्यात आला आहे. यासोबतच काही हिंदी मालिकेंचा देखील मराठी रिमेक करण्यात आला आहे. दीया और बाती या हिंदी मालिकेचा मराठी रिमेक स्टार प्रवाहवरील फुलाला सुंगध मातीचा ही मालिका करण्यात आला आहे. मालिका जरी रिमेक असल्या तरी त्यातील कथानक तसेच कलाकारमुळे मालिका प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत असतात.  अशा अनेक मालिक आहेत ज्यांचे रिमेकनी देखील प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial