घाडग्यांच्या सूनेनं बाप्पाकडे मागितलं 'हे' मागणं

कलर्स मराठीवरील 'घाडगे & सून' मालिकेमध्ये देखील गणरायाचे आगमन होणार आहे. सध्या मालिकेमध्ये अमृता माईना झालेल्या आजारामुळे चिंतेत आहे, माईना बरं करणं हे एकमेव ध्येय आता अमृतासमोर आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2018 07:36 AM IST

घाडग्यांच्या सूनेनं बाप्पाकडे मागितलं 'हे' मागणं

मुंबई, 15 सप्टेंबर : कलर्स मराठीवरील 'घाडगे & सून' मालिकेमध्ये देखील गणरायाचे आगमन होणार आहे. सध्या मालिकेमध्ये अमृता माईना झालेल्या आजारामुळे चिंतेत आहे, माईना बरं करणं हे एकमेव ध्येय आता अमृतासमोर आहे. घाडगे सदनमध्ये कोणालाच माईच्या आजाराबद्दल माहिती नाही. परंतु आता मात्र माई सगळ्यांना त्यांना कर्करोग असल्याचे सत्य तसेच त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत हे सांगणार आहेत.

हे घरातल्यांना कळल्यामुळे सगळेच खूप दु:खी झाले आहेत तसेच वसुधाला देखील खूप वाईट वाटतं. अक्षयला हे सत्य कळल्यावर तो हनिमूनवरून थेट माईना भेटायला घाडगे सदनमध्ये येतो. घरात गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि माईना झालेल्या आजाराचे कळल्यामुळे अण्णा अक्षयला घरामध्ये येऊ देतात. मालिकेमध्ये गेल्या काही महिन्यापासून अक्षय, अमृताच्या आयुष्यामध्ये बऱ्याच घटना घडल्या आहेत. गणपतीला अमृताचे हेच मागणं असणार आहे,  माईना बरं करं आणि सगळ्या संकटाच निवारण कर.

घरामध्ये बऱ्याच दिवसांनी अक्षय आल्यामुळे त्याला बघून माई खूपच हळव्या होतात. अक्षयच्या येण्याने संपूर्ण घरामध्ये आनंदाच वातावरण आहे, कारण खूप दिवसांनी सगळे एकत्र आले आहेत. अक्षय घरी जात असताना अमृता त्याला कियाराला बाप्पाच्या दर्शनासाठी घेऊन ये असं सांगते. त्यामुळे अक्षय खूश आहे. पण कियारा घरात आल्याने काय घडेल ? तिला घाडगे परिवार स्वीकारेल का ? अण्णा आणि मी तिला आशीर्वाद देतील का ?

VIDEO: हा पाहा लहान मुलींना पट्ट्याने निर्दयपणे मारणारा स्वीमिंग कोच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2018 07:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...