संजय राऊत बनवणार जाॅर्ज फर्नांडिसांवर सिनेमा

बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवल्यानंतर कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केलीय.

Sonali Deshpande | Updated On: Jun 18, 2018 05:55 PM IST

संजय राऊत बनवणार जाॅर्ज फर्नांडिसांवर सिनेमा

मुंबई, १८ जून : बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवल्यानंतर कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केलीय. मुंबई मिररला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी ही गोष्ट मान्य केलीय.

आपल्या आयुष्यात बाळासाहेबांएवढेच आपण जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्त्वगुणांवरही प्रभावित झालो होतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची इच्छा राऊत यांनी व्यक्त केलीय. मुंबई बंद करून दाखवण्याची क्षमता जॉर्ज यांच्याकडे होती त्यामुळे या सिनेमाचं नाव 'बंद' असं असू शकतं असंही राऊत यांनी सांगितलंय.

मुंबई मिररशी बोलताना ते म्हणाले, पटकथा तयार आहे. सिनेमा हिंदी आणि मराठीत बनणारेय. बाकी निवड सुरू आहे.'

जाॅर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब ठाकरे चांगले मित्र होते.

हेही वाचा

VIDEO - जान्हवी कपूरनं भाऊ अर्जुन कपूरच्या गाण्यावर घेतले ठुमके

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2018 05:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close