Home /News /entertainment /

'मी आता हे करू शकत नाही…', लग्नाच्या एका महिन्यातच जेनेलियाने रितेशकडे केली होती तक्रार

'मी आता हे करू शकत नाही…', लग्नाच्या एका महिन्यातच जेनेलियाने रितेशकडे केली होती तक्रार

'लेडीज व्हर्सेस जेंटलमेन' (Ladies Vs Gentlemen) या शोच्या सीझन 2 मध्ये, जेनेलिया देशमुखने (Genelia DSouza on her marriage) एक खुलासा केला आहे.

  मुंबई, 18 डिसेंबर - 'लेडीज व्हर्सेस जेंटलमेन' (Ladies Vs Gentlemen) या शोच्या सीझन 2 मध्ये, जेनेलिया देशमुखने (Genelia DSouza on her marriage)  एक खुलासा केला आहे. जेव्हा तिने रितेश देशमुखशी (Riteish Deshmukh) लग्न केले तेव्हा ती दररोज सकाळी सर्वांच्या आधी तयार होत असे. मात्र, नंतर मला या तयार होण्याचा कंटाळा आला. एक महिन्यानंतर ती म्हणाली, 'मी हे करू शकत नाही.' अभिनेत्रीने सांगितले की, तिला रोज सकाळी असं उटून तयार होण्याचा कंटाळा येतो. जेनेलिया म्हणते, 'जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मला वाटले की, मी एकदम परफेक्ट आहे. मी रोज सकाळी तयार होत असे. मला रोज असे कपडे का घालावे लागतात याची मला चिडचिड व्हायची. पुढे रितेश म्हणाला, तो बॉक्सर्स आणि टी-शर्ट घालून जेवणाच्या टेबलावर बसायचा, तर जेनेलिया पूर्णपणे सलवार कमीज आणि दागिन्यांमध्ये सजलेली असायची. त्याला असे वाटायचे की तिने कोणती तरी पूजा असेल किंवा कोणता कार्यक्रम असेल त्यासाठी करत असेल. हे एक महिना सुरु होतं त्यानंतर जेव्हा जेनेलियाने त्याला सांगितलं तेव्हा त्याला कळलं की कोणती पूजा किंवा कार्यक्रम नाही आहे. वाचा-टप्पूच्या शो सोडण्यावर मेकर्सनी सोडलं मौन; बबिताजीविषयी केला मोठा खुलासा जेनेलिया म्हणाली, एक दिवस मी म्हणाले, मी हे करू शकत नाही. तेव्हा रितेश गोंधळला आणि म्हणाला काय झालं? मी म्हणाली, मी रोज असे कपडे घालू शकत नाही. तेव्हा रितेश म्हणाला, मलाही आश्चर्य वाटतंय की तू रोज असे कपडे का घालतेस!
  View this post on Instagram

  A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

  रितेश आणि जेनेलियाची भेट त्यांच्या पहिल्या चित्रपट 'तुझे मेरी कसम'च्या शूटिंगदरम्यान झाली होती. हे जोडपे 15 वर्षांहून अधिक काळ एकत्र आहेत. 3 फेब्रुवारी 2012 रोजी त्यांचे लग्न झाले आणि त्यांना राहिल आणि रियान ही दोन मुले आहेत. शुक्रवारी रितेशच्या वाढदिवशी जेनेलियाने इंस्टाग्रामवर एक क्यूट नोट शेअर केली. तिने लिहिले, 'प्रिय मित्रा, माझा विश्वास आहे की या पृथ्वीवर प्रत्येक माणसावर प्रेम करणारी एक खास व्यक्ती असते. मी माझ्यासाठी खूप आनंदी आहे की तू कायमचा फक्त माझा आहेस.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment

  पुढील बातम्या