Genelia D'souza Birthday : 9 वर्षांनी मोठ्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलासोबत लग्न करणारी जेनेलिया आहे 'इतक्या' कोटींची मालकीण
Genelia D'souza Birthday : 9 वर्षांनी मोठ्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलासोबत लग्न करणारी जेनेलिया आहे 'इतक्या' कोटींची मालकीण
जेनेलिया डिसूझानं बॉलिवूड, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करुन आपल्या अभिनयानंही अनेकांची मनं जिंकली आहेत. अशातच जेनेलियाच्या वाढदिवसानिमित्त तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
मुंबई, 5 ऑगस्ट : आपल्या हास्यानं आणि निखळ सौंदऱ्यानं सगळ्यांना वेड लावणारी भारतीय अभिनेत्री म्हणजे जेनेलिया डिसूझा. जेनेलिया डिसूझाचा आज वाढदिवस आहे (Genelia Dsouza Birthday). त्यामुळे सध्या सगळीकडे तिचीच चर्चा होताना दिसतेय. जेनेलियाचा जन्म 5 ऑगस्ट 1987 रोजी मुंबईत झाला असून आज ती तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. जेनेलियानं बॉलिवूड, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करुन आपल्या अभिनयानंही अनेकांची मनं जिंकली आहेत. अशातच जेनेलियाच्या वाढदिवसानिमित्त तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
जेनेलिया डिसूझाच्या नावाबाबत एक मनोरंजक किस्सा माहितीये का?. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. जेनेलिया डिसूझा हे नाव तिच्या आई आणि वडिलांच्या नावावर आहे. जेनेलियाच्या आईचे नाव जेनेट आणि वडिलांचे नाव नील आहे, त्यामुळे तिचे नाव 'जेनेलिया' ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा - Kajol Birthday : 'बाजीगर'ची प्रिया ते 'त्रिभंगा'ची अनुराधा; असा आहे काजोलचा फिल्मी प्रवास
जेनेलियानं 2003 मधे 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं. या चित्रपटात जेनेलियासोबत अभिनेता रितेश देशमुखनं मुख्य भूमिका साकरली होती. पहिल्या भेटीत जेनेलियाला रितेश अजिबात आवडला नाही. तिला वाटलं की, हा महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे तर याच्यात खूप इगो असेल किंवा खूप अॅटिट्यूड असेल. मात्र, हळूहळू या चित्रपटावेळी दोघेही एकमेकंच्या प्रेमात पडले होते. जवळपास 9 वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. जेनेलिया आणि रितेश यांना दोन मुलेही आहेत. त्यांचं नाव रियान देशमुख आणि राहिल देशमुख असं आहे. आज त्यांचं नाव बॉलीवूडच्या क्यूट कपलमध्ये येतं.
फिल्मी दुनियेत जेनेलियाला एका जाहिरातीतून ओळख मिळाली. ही जाहिरात जेनेलियाने अमिताभ बच्चनसोबत केली होती. त्यावेळी जेनेलिया फक्त 15 वर्षांची होती. अभिनयासोबतच खेळातही तिला आवड होती. ती एके काळी राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू राहिली आहे.
जेनेलिया डिसूजाचं नाव लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक असून तिचा चाहता वर्गही बराच मोठा आहे. जेनेलियाची एकूण संपत्ती 42 कोटी रुपये आहे. तिचं आयुष्य ती एकदम आरामदायी आणि हटके स्टाइलनं जगते. जेनेलिया लग्नानंतर 10 वर्षांनी पुन्हा सिनेसृष्टीत कमबॅक करणार आहे. ती मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या कामांमध्ये व्यस्त असल्याचं समोर येतंय.
Published by:Sayali Zarad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.