मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Genelia Deshmukh शॉर्ट ड्रेसमुळे होतेय ट्रोल, इंटरनेटवर हा VIDEO VIRAL

Genelia Deshmukh शॉर्ट ड्रेसमुळे होतेय ट्रोल, इंटरनेटवर हा VIDEO VIRAL

जेनेलिया डिसूझाचा (Genelia D'Souza) पार्टी दरम्यानचा एक शॉर्ट ड्रेसमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये ती ड्रेस सारखा सारखा हाताने नीट करताना दिसत आहे.

जेनेलिया डिसूझाचा (Genelia D'Souza) पार्टी दरम्यानचा एक शॉर्ट ड्रेसमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये ती ड्रेस सारखा सारखा हाताने नीट करताना दिसत आहे.

जेनेलिया डिसूझाचा (Genelia D'Souza) पार्टी दरम्यानचा एक शॉर्ट ड्रेसमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये ती ड्रेस सारखा सारखा हाताने नीट करताना दिसत आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 26 ऑक्टोबर : सलमान खानच्या (Salman Khan Latest News) कुटुंबासाठी 26 ऑक्टोबर हा दिवस खूप खास आहे. कारण आज सलमानची लाडकी बहीण अर्पिताचा नवरा अभिनेता आयुष शर्माचा (Ayush Sharma Birthday) वाढदिवस आहे. यानिमित्त एका लेट नाईट पार्टीचे आयोजन करण्याता आले होते. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सनी हजेरी लावली. यामध्ये रितेश देशमुख (Riteish Deshmukh and Genelia D'Souza) आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा यांचा देखील समावेश होता. सध्या यांचा या पार्टी दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

शॉर्ट ड्रेसमुळे जेनेलिया चर्चेत

जेनेलिया या पार्टीत नवरा रितेश देशमुखसोबत पोहचली होती. या पार्टीला जेनेलियाने शॉर्ट ड्रेस घातला होता. विशेष म्हणजे ती हा ड्रेस हाताने सारखा सारखा खाली ओडून नीट म्हणजे अॅडजस्ट करताना दिसली. ती या कपड्यात काहीशी कंफर्टेबल नव्हती, असे आढळून आले. दरम्यान असं जरी असलं तरी या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. तिच्या मेकअपने ती नेहमीपेक्षा खूपच सुंदर दिसत होती.

हे वाचा : अभिनेत्री यामी गौतमच्या मंगळसूत्रनं वेधलं सर्वांचं लक्ष; किंमत ऐकून व्हाल थक्क

जेनेलियाने ग्रे रंगचा डेनिमचा शॉर्ट  शर्ट घातला आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे ती खूपच सुंदर दिसत आहे. मात्र फोटोग्रफर्संन पोज देताना ती  तिचा ड्रेस हाताने नीट करताना दिसली.  तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक नेटकऱ्यांने म्हटले आहे- मॅम तुमच्याजवळ कपडे नव्हते का? अनेकवेळा बॉलिवूड अभिनेत्रींना कपड्यावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. जेनेलियाला देखील काहींनी ट्रोल केलं आहे तर काहींनी तिच्या सुंदरतेची कौतुक केलं आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाबॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून ओळखले जातं. ही जोडी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव असते. विविध फोटो, व्हीडीओ यामुळे सोशल मीडियावर यांचा बोलबाला असतो. ही जोडी 18 वर्षे झालं एकमेकांसोबत आहेत. या दोघांना दोन मुलं देखील आहेत. त्यांच्यासोबत देखील ही काही रील शेअर करत असतात. 9 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाला 9 वर्षे झाले आहेत.

हे वाचा- वर्षा उसगांवकर धरणार ममता बॅनर्जींचा हात, गोव्यात करणार पक्षप्रवेश- सूत्र

दोघेही 9 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्नाच्या बंधनात अडकले. अलीकडे काही महिन्यातच ब्रेकअप होताता मात्र या दोघांनी आधी 9 वर्षे आता संसारीची यशस्वी 9 वर्षे असी 18 वर्षे एकत्र पूर्ण केली आहेत. आजही त्यांच्यातील प्रेम दिसतं. दोघांची केमेस्ट्री देखील प्रेक्षकांना खूप आवडते.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Ritesh deshmukh, Salman khan