मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /जेनेलियाला वय विचारताच पडली बुचकळ्यात, मग म्हणते कशी...Video Viral

जेनेलियाला वय विचारताच पडली बुचकळ्यात, मग म्हणते कशी...Video Viral

पती रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे अनेक व्हिडीओ जेनेलिया शेअर करते. आताही जेनेलियाच्या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

पती रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे अनेक व्हिडीओ जेनेलिया शेअर करते. आताही जेनेलियाच्या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

पती रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे अनेक व्हिडीओ जेनेलिया शेअर करते. आताही जेनेलियाच्या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मुंबई, 23 नोव्हेंबर- जेनेलिया देशमुख  (genelia deshmukh )सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. पती रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे अनेक व्हिडीओ जेनेलिया शेअर करते. आताही जेनेलियाच्या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

जेनेलिया देशमुखने एक इन्स्टा रील शेअर केले आहे. यामध्ये सुरुवातीला एक व्यक्ती तिला ‘हॅलो’ असे म्हणतो. त्यानंतर तो विचारतो की “तुझे वय किती आहे?” यावर जेनेलिया म्हणते, ‘22 वर्षे….’ त्यावर तो व्यक्ती म्हणतो…२२ वर्षे, पाच वर्षांपूर्वीही तू 22 वर्षच वय सांगितले होतेस.” यानंतर मात्र जेनेलिया काहीशी बुचकळ्या पडते आणि म्हणते की, “बघितलं, आम्ही मुली किती एखाद्या गोष्टींवर ठाम असतो” आणि त्यानंतर ती आजूबाजूला बघताना दिसते.

वाचा : आदिराज आणि मीरा यांच्यामध्ये आलेली ही तिसरी व्यक्ती कोण?

जेनेलिया या व्हिडीओला मस्त अशी कॅप्शन देखील दिली आहे.मुली या मनाने नेहमी तरुण असतात हे कॅप्शन तिने या व्हिडियोला दिलं आहे. या व्हिडियोतील जेनेलियाचा क्यूट अंदाज नेहमीप्रमाणे चाहत्यांचे लक्षवेधून घेत आहे.

'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा ओळख झाली होती. तेथूनचं त्यांच्या मैत्रीला आणि प्रेमाला सुरुवात झाली होती. हे बॉलीवूडमधील असं जोडपं आहे, ज्याचं इतर कोणत्याही बॉलीवूड कलाकारासोबत नाव जोडलं गेलं नाही. 'तेरे नाल लव हो गया' या चित्रपटाच्या माध्यमातून दोघांच्या प्रेमाची एक उत्कृष्ट केमिस्ट्री समोर आली होती.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

रितेश आणि जेनेलियाने एकमेकांना दहा वर्षे डेट केल्यानंतर, 03 फेब्रुवारी 2012 मध्ये लग्न केलं होतं. आज या जोडीला दोन क्युट मुलही आहेत.रितेश आणि जेनेलिया यांचा पहिला मुलगा रियानचा जन्म नोव्हेंबर 2014 मध्ये झाला होता. तर दोन वर्षांनी 2016 मध्ये त्याचा दुसरा मुलगा राहलचा जन्म झाला होता. रितेश नेहमी त्याच्या मुलांसोबत फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असतो.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment