रितेश देशमुखच्या 'माऊली'मध्ये मिळणार सरप्राईझ!

रितेश देशमुखच्या 'माऊली'मध्ये मिळणार सरप्राईझ!

डिसेंबरच्या 14 तारखेला 'माऊली' रिलीज होतोय. माऊली सिनेमाचं पहिलं गाणं तर रिलीज झालं. आता दुसरं गाणं लाँच होणार आहे. त्यात रसिकांना खास ट्रिट आहे.

  • Share this:

मुंबई, 2 डिसेंबर : डिसेंबरच्या 14 तारखेला 'माऊली' रिलीज होतोय. माऊली सिनेमाचं पहिलं गाणं तर रिलीज झालं. आता दुसरं गाणं लाँच होणार आहे. त्यात रसिकांना खास ट्रिट आहे.

रितेश देशमुख आणि त्याची बायको जेनेलियाचं गाणं माऊलीत आहे.  दोघं मिळून होळीच्या गाण्यावर थिरकलेत. गाणं काॅमेडी आहे. 'सर्फ लावून धुऊन टाक' असे बोल असलेल्या या गाण्याचं संगीत अजय-अतुलचं आहे.

रितेश म्हणतो, ' हे गाणं करायला मला तसं भागच पाडलं. पण जेनेलिया आहे म्हटल्यावर मलाही छान वाटलं. प्रेक्षक हे गाणं नक्कीच एंजाॅय करतील.' रितेश आणि जेनेलियाचं 'लय भारी'मध्येही गाणं होतं.

काही दिवसांपूर्वी सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला.या ट्रेलरमध्ये अख्ख्या सिनेमाची झलक दिसते. रितेश देशमुखची व्यक्तिरेखा सर्जेराव देशमुखची आहे. गावातल्या अन्यायाविरोधात तो आवाज उठवतोय. गुंडांना नेस्तनाबुत करतोय. तो इन्स्पेक्टरही आहे आणि वर्दी उतरवल्यावर तो गुंडांचा कर्दनकाळ बनतोय. सयामी खेर या सिनेमात नायिका आहे.

सलमान खाननं माऊलीचा ट्रेलर ट्विट केलाय. सर्वांचा भाऊ  आणि आपला माऊली येतोय. एन्ट्रीवर शिट्टी वाजवा, असंही त्यानं म्हटलंय.

माऊली सिनेमात सिद्धार्थ जाधवचीही भूमिका आहे.सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलंय, तर अजय अतुलचं संगीत आहे. क्षितीज पटवर्धन यांनी सिनेमा लिहिलाय.

रितेश देशमुखची बायको जेनेलिया या सिनेमाच्या निर्मितीचं काम पाहतेय. मध्यंतरी माऊली सिनेमाबद्दल बोलताना रितेश म्हणाला होता, 'लय भारी सिनेमाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आता मराठीत अभिनय करण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. मला साहसदृश्य आणि मनोरंजनपूर्ण चित्रपटांमध्ये झळकायला आवडेल. विशेष म्हणजे 'माऊली' चित्रपटाची पटकथा वाचल्यानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटामध्ये पदार्पण करण्याचा निर्णय मी घेतला.'

राणादाला कुस्तीसाठी प्रोत्साहन देणारी अंजली 'या' खेळांमध्ये पटाईत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2018 05:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading