Home /News /entertainment /

Gehraiyaan Trailer Release: दीपिका पादुकोण- सिद्धांत चतुर्वेदीच्या किसिंग सीन्सने वेधले लक्ष, पाहा VIDEO

Gehraiyaan Trailer Release: दीपिका पादुकोण- सिद्धांत चतुर्वेदीच्या किसिंग सीन्सने वेधले लक्ष, पाहा VIDEO

Deepika Padukone Gehraiyaan Trailer Video: मागच्या काही दिवसांपासून प्रेक्षक दीपिकाच्या 'गहराइयां' सिनेमाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. अगदी तरूणाईला आवडेल असाच ट्रेलर आहे.

  मुंबई, 20 जानेवारी - दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) आगामी ‘गहराइयां’ (Gehraiyaan) या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते की, 'गहराइयां' हा सिनेमा बदलत्या काळातील नातेसंबंधावर आधारित आहे. आजच्या काळातील नात्याची गुंतागुत या ट्रेलरमध्ये पाहायला मिलत आहे. शकुन बत्रा या सिनेमाची दिग्दर्शक आहे. दीपिकासोबत या सिनेमात अनन्या पांडे (Ananya Panday) आणि सिद्धांत चतुर्वेदीने(Siddhant Chaturvedi) देखील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यासोबत नसीरुद्दीन शहा आणि रजत कपूर देखील यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. गहराइयां हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर (Amazon Prime Video) 11 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. भारतासह जगातील 240 देशांमध्ये या सिनेमाचे वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. 'गहराइयां' या सिनेमाच्या ट्रेलरची प्रेक्षक मागच्या काही दिवसांपासुन वाट पाहत होते. आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. प्रेक्षकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये दीपिका आणि सिद्धांतच्या अफेवरविषयी दाखवण्यात आलं आहे. ही दोघेही दुसऱ्या वक्तीसोबत नात्यात असल्याचे देखील दाखवण्यात आलं आहे. असं असताना देखी हे एकमेंकावर प्रेम करताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये दीपिका आणि सिद्धांतचा किसिंग सीन आणि त्यांच्यातील प्रेम सहज दिसत आहे.
  दीपिकाचे ओटीटीवर पदार्पण दीपिकाने काल या सिनेमाच्या ट्रेलरबदल माहिती दिली होती. आजा 20 जानेवारीला ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता हा सिनेमा डायरेक्ट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. दीपिकाच्या फॅन्ससाठी ही पर्वणीच असणार आहे. यानिमित्त दीपिकाचे ओटीटीवर पदार्पण होणार आहे. चाहते यासाठी उत्सुक आहेत. वाचा-'मला सलमान खानच्या पाठीवरचं माकड व्हायचं नाही', झरीन खान का संतापली? ट्रेलरमधून दिसुन येते नाती, प्रेमसंबध याची झालेली गुंतागुत दीपिकाने तिच्या चाहत्यांसाठी गहराइयां या सिनेमाचे सात पोस्टर 5 जानेवरी म्हणजे तिच्या वाढदिवसानिमित्त शेअर केले होते. यामध्ये दीपिका सिद्धांत चतुर्वेदीला किस करताना दिसली होती. आता ट्रेलरमध्ये देखील असंच काहीसे पाहायला मिळत आहेत. आजच्या काळातील नाती, प्रेमसंबध याची झालेली गुंतागुत यामध्ये दिसून येत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Ananya panday, Bollywood News, Deepika padukone, Entertainment

  पुढील बातम्या