Home /News /entertainment /

राज कुंद्राची पाठराखण करणाऱ्या गहना वशिष्ठने सांगितलं कसे शूट होतात Nude Videos

राज कुंद्राची पाठराखण करणाऱ्या गहना वशिष्ठने सांगितलं कसे शूट होतात Nude Videos

गहनाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिने शूटिंग कसं होतं हे सांगितल आहे. गहनाने म्हटलं की बिना कपडे शूट करण्यासाठी कोणीही कोणाला जबरदस्ती करत नाही.

  मुंबई  10 सप्टेंबर : अश्लील चित्रफिती प्रकरणात राज कुंद्रासह (Raj Kundra) अभिनेत्री गहना वशिष्ठच (Gahana Vashishth) देखील सुरुवातीपासून नाव समोर येत आहे. गहनाने अनेकदा Pornography प्रकरणावर भाष्य केलं आहे. अनेकदा तिने लाईव्ह येत राज कुंद्राच समर्थन देखील केलं आहे. तर आता तिने न्यूड फोटो किंवा व्हिडीओ कसे शूट होतात हे सांगितल आहे. गहनाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिने शूटिंग कसं होतं हे सांगितल आहे. गहनाने म्हटलं की बिना कपडे शूट करण्यासाठी कोणीही कोणाला जबरदस्ती करत नाही. गहनाने तिच्या पोस्ट मध्ये लिहिलं की, ‘हयात रेजन्सी मध्ये हे फोटो शूट करताना आम्ही जवळपास 20 लोकं उपस्थित होतो. माझं कोणतंही यौन शोषण झालं नाही. ना मी नशेत होते ना मी सेटवर कोणता ज्यूस प्यायले होते. मी पूर्णपणे शुद्धीत होते. मी एका ऑटोने सेटवर गेले होते व दुसऱ्या ऑटोने सुरक्षित घरी आले. मला माझं पेमेंट देखील मिळालं.’
  पुढे ती म्हणाली, ‘विशेष म्हणजे मी 18 पूर्ण आहे. आणि एक रेगुलर आर्टिस्ट आहे. त्यामुळे कृपया दीड वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळानंतर येऊन माझ्या प्रोड्युसर्सवर 370, 354 आणि 376 चे आरोप लावू नका.’
  दरम्यान फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांनी गहना ला अटक केली होती. त्यानंतर जवळपास 5 महिने ती जेल मध्ये होती. मात्र त्यानंतर राज कुंद्रालाही अटक करण्यात आली. गहना जेलच्या बाहेर आल्यापासून सातत्याने राज कुंद्रा ची पाठराखण करताना दिसत आहे. सुरुवातीला तिने पोर्न (Porn) आणि एरोटिक (Erotic videos) व्हिडिओज मधील फरक समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Raj kundra

  पुढील बातम्या