मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

 Bigg Boss Marathi 3 च्या घरात गायत्री - मीनलमध्ये जोरदार भांडण, पाहा VIDEO

 Bigg Boss Marathi 3 च्या घरात गायत्री - मीनलमध्ये जोरदार भांडण, पाहा VIDEO

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये (Bigg Boss Marathi 3 ) टास्कमध्ये कोणता नंबर कुणी घ्यायचा यावरून मीनल आणि गायत्री यांच्यात जोराचं भाडणं झालं आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये (Bigg Boss Marathi 3 ) टास्कमध्ये कोणता नंबर कुणी घ्यायचा यावरून मीनल आणि गायत्री यांच्यात जोराचं भाडणं झालं आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये (Bigg Boss Marathi 3 ) टास्कमध्ये कोणता नंबर कुणी घ्यायचा यावरून मीनल आणि गायत्री यांच्यात जोराचं भाडणं झालं आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 8 नोव्हेंबर:  बिग बॉस मराठीच्या घरामध्ये (Bigg Boss Marathi 3 ) टास्क दरम्यान सदस्यांमध्ये वादावादी, भांडण, धक्केबुक्के होणं काही नवं नाहीये. आज घरामध्ये आठवड्याच्या पाहिल्या टास्कमध्ये, पहिल्या दिवशी मीनल आणि गायत्रीचे जोरदार भांडण होताना दिसणार आहे. असा कुठला टास्क आहे हा ज्यामध्ये मीनल आणि गायत्री यांचे भांडण झाले. मीनल – गायत्रीला एकमेकींची कुठली गोष्ट पटली नाही.

सदस्यांनसमोर 1 ते 10 असे नंबर होते आणि त्या नंबरवरती जाऊन उभे राहायचे होते. पहिल्यावर स्नेहा, 2 नंबरवर मीनल, 3 वर गायत्री, 4 वर विकास, 5, 6 आणि 7 नंबरवर अनुक्रमे  सोनाली, नीथा आणि दादूस, तर आठ, नऊ आणि दहा नंबर अनुक्रमे उत्कर्ष, जय आणि विशाल हे सदस्य उभे राहिले आणि त्यांना पटवून द्यायचे आहे की का ते त्यांनी सांगितलेल्या नंबरवर जाण्यास पात्र आहेत. आणि याचवरून मीनल आणि गायत्रीमध्ये भांडण होणार आहे.

वाचा :‘बबड्या’ दिसणार आता नव्या भूमिकेत; इन्स्टा पोस्ट करत दिली माहिती

जयचे म्हणणे आहे तो 1 नंबरवर असण्यास पात्र आहे आणि स्नेहा 7 नंबरवर deserve करते. त्यावर स्नेहाने स्पष्ट शब्दात नकार दिला. जयने इतर सदस्यांना देखील विचारले कोणाला हे वाटतं का की मी 1 नंबरवर असायला पाहिजे. तर गायत्रीने त्यावर सहमती दिली. तर मीरा म्हणाली “मला उत्कर्ष देखील वाटतो. मीनल त्यावर गायत्रीला म्हणाली तू 3नंबर सोडू शकतेस... आणि इथून वादाला सुरुवात झाली. गायत्रीचे म्हणणे आहे ते माझ्यापेक्षा बेटर आहेत आणि तुम्हा दोघींपेक्षा देखील बेटर आहेत म्हणून... मी तीन नंबरच deserve करते 1 आणि 2 नंबर त्यांच्याकडे हवा, गायत्री मीनलला असं देखील म्हणाली तू दोन नंबर deserve नाही करत...

वाचा :कंगना,पी व्ही सिंधूसह 119 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान

यावरून या दोघींच्यात वादाला सुरूवात होते. आता पुढं काय होणार कुणाला कोणता नंबर मिळणार एक नंबर कुणाकडे जाणार हे सगळं येणाऱ्या भागात समजणार आहे.

बघूया पुढे काय होते ते ? तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिजन तिसरा कलर्स मराठीवर.

First published:

Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Colors marathi, Entertainment, Marathi entertainment