मुंबई, 28 मार्च- गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे. अनेक कार्यक्रमासाठी गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलवतात. तिच्या डान्सनं तरूणाईला वेड लावलं आहे. तिची एका आदा पाहण्यासाठी तरूण वर्ग वाटेल ते करताना दिसतो. आता गौतमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना एक प्रश्न सारखा सतावत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील आपल्या दिसते. यावेळी गौतमीनं केलेला डान्स चाहत्यांना नेहमीप्रमाणे आवडला आहे. मात्र यावेळी गौतमीच्या कपाळाला असलेलं कुंकू चाहत्यांना प्रश्नात टाकून गेलं आहे. अनेकांनी एवढं मोठं कुंकू कुणाच्या नावानं लावलं. असा प्रश्न विचारला आहे.
वाचा-वडील गेल्यानंतर 16दिवसांनी आईचाही मृत्यू;'आई कुठे...'च्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर
गौतमीच्या डान्सची क्रेझ वाढतचं आहे. सोशल मीडियावर तिचे दररोज कोणते कोणते व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच तिच्या एका कार्यक्रमात एका तरूणाने तिच्यासारखाच डान्स करून तिलाच ठक्कर दिली होती. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हणजे गर्दी आणि राडा जणू सूत्रच बनलं आहे. अनेकदा तिच्या कार्यक्रमात पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत आहे.
View this post on Instagram
यात्रा-जत्रा असुदे का बर्थडे असुंदे सगळीकडं गौतमी पाटीलच्या कार्यक्रामाची हवा पाहायला मिळत आहे. राजकीय मंडळी देखील आता गौतमीचा कार्यक्रम आयोजित करताना दिसत आहे. सुरूवातील गौतमीवर खूप टीका झाली. तिनं माफी देखील मागितली. आता गौतमीच्या कार्यक्रम पाहण्यासाठी पुरूषच नाही तर महिला देखील गर्दी करताना दिसतात. गौतमीचा लवकरच 'घुंगरू' नावाचा चित्रपट येतो आहे. या चित्रपटाचे शूटिंग थायलंडमध्ये पार पडले. याशिवाय सोलापूर, माढा, हंपी या ठिकाणीही चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती बाबा गायकवाड यांनी केली आहे. तेच या चित्रपटात गौतमीसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचे म्हटले जाते आहे.
धुळ्याच्या शिंदखेडा गावात गौतमी पाटील हिचा जन्म झाला. गौतमीचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी तिच्या वडिलांनी आईला सोडून दिलं. त्यामुळे ती आपल्या आजोळीच शिंदखेडा येथे लहानाची मोठी झाली.गौतमी आठवीला असताना उदरनिर्वाहासाठी तिचं कुटुंब पुण्यात आलं. दरम्यान आई छोटी-मोठी कामं करून घर चालवायची.धुळ्याच्या शिंदखेडा गावात गौतमी पाटील हिचा जन्म झाला. गौतमीचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी तिच्या वडिलांनी आईला सोडून दिलं. त्यामुळे ती आपल्या आजोळीच शिंदखेडा येथे लहानाची मोठी झाली. गौतमी आठवीला असताना उदरनिर्वाहासाठी तिचं कुटुंब पुण्यात आलं. दरम्यान आई छोटी-मोठी कामं करून घर चालवायची. गौतमी सुरुवातीपासून पुण्यातील विश्व कला नृत्य अकादमी येथे नृत्याचं प्रशिक्षण घेत होती. त्यामुळे नृत्य क्षेत्रातच काम करून गुजराण करण्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले.सुरुवातीच्या काळात बॅक डान्सर म्हणून काम केलं. नंतर पुढे आघाडीची लावणी कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळत गेली.यानंतर सोशल मीडियावरही तिचे व्हीडिओ व्हायरल होऊ लागले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.