मुंबई, 26 मे : संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नुकताच गौतमीचा वसई-विरारमध्ये कार्यक्रम पडला. सत्यनारायणाच्या पुजेनिमित्त गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्तानं गौतमी पहिल्यांदा मुंबईच्या दिशेनं आली. वसईतील गौतमीचा कार्यक्रम तर दणक्यात पार पडला. या कार्यक्रमाला कोणतंही गालबोट लागलं नाही. सोशल मीडियावर गौतमीचे फोटो आणि व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. सत्यनारायणाच्या पुजेसाठी ठेवलेल्या गौमतीच्या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा होत असताना सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओनं गौतमीच्या चर्चा आणखी वाढल्या आहेत.
गौतमी महाराष्ट्राच्या अनेक भागात कार्यक्रम करत असते. प्रामुख्याने पुण्यात गौतमीचे सर्वाधिक कार्यक्रम आयोजित केले जातात. आजवर गौतमीनं हजारो शो केलेत. कधी बायकोच्या वाढदिवसाला, तर कधी बैलाच्या वाढदिवसाला तसंच राजकीय कार्यक्रमांना देखील गौतमीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रत्येक कार्यक्रमावेळी गौतमीचे अनेक व्हिडीओ झपाट्यानं सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यावर गौतमीला ट्रोल करण्यात आलंय.
हेही वाचा - Gautami Patil: गौतमी पाटीलचे चाहते आहात? मग या 5 गोष्टी तुम्हालाही माहिती हव्याच
अश्लिल हावभाव करते, इशारे करते म्हणून गौतमीवर जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र त्यानंतर गौतमीनं स्वत:मध्ये बदल केले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती अश्लिल हावभाव करत नसली तरी तिच्या वागण्यावर अनेकांची टीका केली आहे. व्हिडीओमध्ये गौतमी नाचत आहे. तिथे एक शाळेतला मुलगा येतो. त्याच्याबरोबर ती मस्ती करताना दिसतेय.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये आधी गौतमी त्या मुलाच्या गालावर किस करायला जाते पण तो मुलगा मात्र गौतमीपासून दूर जातो. त्यानंतर मुलगा गौतमीच्या गालावर किस करायला जातो पण गौतमी त्याला किस करू देत नाही. शेवटी गौतमीचं त्या मुलाच्या गालावर किस करते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - Gautami Patil Fees: गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी किती पैसे घेते?
व्हिडीओवर काही युझर्सनी कमेंट्स करत गौतमीची अक्कल तर काढलीच आहे. पण त्याबरोबर त्या मुलाला देखील चांगलाच सुनावलं आहे. एका युझरनं लिहिलंय, "मुलाला आई - वडील नाहीत का? त्यांनी कारवाई करावी हिच्यावर, बंधन घालावं सरकारने मुलांना तरी सोडा वाईट सवय लागतेय त्यांना". दुसऱ्या युझरनं लिहिलंय, "खरंच महाराष्ट्राचा बिहार करून सोडणार ही पोरगी". आणखी युझरनं, "असले चाळे करून कलेचा अपमान करू नकोस", असं म्हटलं आहे.
गौतमीची हा व्हिडीओ नेमका कोणत्या कार्यक्रमाचा आहे याची माहिती समोर आलेली नाही. परंतु या व्हिडीओला सोशल मीडियावर 1 M हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.