मुंबई, 01 एप्रिल प्रतिनिधी, रायचंद शिंदे: टिक टॉक स्टार आणि लावणी क्वीन म्हणून गौतमी पाटील ओळखली जाते. मागच्या वर्षभरात गौतमी पाटील हे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. गौतमीला पाहण्यासाठी तुफान गर्दी होते. तिच्या कार्यक्रमात चाहत्यांचा गोंधळ होतो. कार्यक्रमात वाद आणि राडा यामुळे ती कायमच चर्चेत असते. गौतमीला फॉलो करणाऱ्यांची आणि कार्यक्रमांना गर्दी करण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गौतमीची लावणी अश्लील असल्याचा आरोप करत तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. पण आता पुन्हा तिच्या नृत्याने महाराष्ट्रातील रसिकांना वेड लावलं आहे. पण गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातून नेहमी वाद आणि राडे होण्याच्या बातम्या समोर येत असताना आता मात्र वेगळंच काहीस घडलं आहे. नेमकं काय घडलं पाहा...
ग्रामीण भागात यात्रा-जत्रा अशा कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. तसेच गावातील एखाद्या पुढाऱ्याचा किंवा व्यापाऱ्याचा वाढदिवस नाच-गाण्याच्या कार्यक्रमांसोबत दणक्यात पार पडण्याची नवी प्रथा सुरु झाली आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये एक गोष्ट सारखी असते आणि ती म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटीलची लावणी. असंच एका ठिकाणी गावच्या यात्रेनिमित्त गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घडलं.
खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे गावच्या यात्रा उत्सवानिमित्ताने गौतमी पाटीलचा लावणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिच्या कार्यक्रमात फक्त तरुणांनीच नाही तर गावातल्या तरुणींनी देखील ठेका धरला होता. विशेष म्हणजे तिच्या या कार्यक्रमात कोणताही गोंधळ झाला नाही. गौतमी पाटीलच्या आदाकारीवर तरुणाईसह गावच्या महिला तरुणी चांगलीच दाद दिली.
गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं कि राडा आलाच मात्र मोहितेवाडीत गौतमीचा कार्यक्रम विनाविघ्न पार पडला. यावेळी तरुणाईसह महिला,तरुणी,चिमुकली मुलं यांनी मोठ्या संख्येने गौतमीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी प्रेक्षकांनी गौतमीच्या आदाकारीला भरभरुन प्रतिसाद देत प्रेक्षक बेभान होऊन थिरकले आहेत,गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ घालण्याचे प्रकार होत असताना हा कार्यक्रम विनाविघ्न पार पडला आणि प्रेक्षकांनीही गौतमीच्या कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घेतला आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गौतमीचा मोठा चाहता वर्ग आहे.छोट्या गावातही गौतमी पाटीलच्या डान्सची क्रेझ पाहायला मिळते. हजारोंच्या संख्येने प्रेक्षक गौतमीच्या कार्यक्रमाला येतात. तरुण बेभान होऊन नाचतात. गौतमीच्या कार्यक्रमात नेहमी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. काही ठिकाणी पोलीस देखील बोलवावे लागतात. असा वेळी तिचा कार्यक्रम निर्विघ्न पार पडला म्हणजे एक आश्चर्यच म्हणावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.