मुंबई,30 मार्च- नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात वाद आणि राडा हे जणू समीकरणच बनलं आहे. गौतमी पाटीलचे किंचितच कार्यक्रम वादविवादांशिवाय पार पडतात. नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी धुडगूस घातला आहे. एका वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गौतमी पाटीलला बोलवण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रम सुरु असताना काही तरुणांनी गाण्याच्या तालावर हुल्लडबाजी करत, वातावरण चांगलंच तापवलं होतं.
ग्रामीण भागात यात्रा-जत्रा अशा कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. तसेच गावातील एखाद्या पुढाऱ्याचा किंवा व्यापाऱ्याचा वाढदिवस नाच-गाण्याच्या कार्यक्रमांसोबत दणक्यात पार पडण्याची नवी प्रथा सुरु झाली आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये एक गोष्ट सारखी असते आणि ती म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटीलची लावणी. सबसे कातिल गौतमी पाटील असं म्हणत गौतमीने सर्वांनाच वेड लावलयं.
(हे वाचा:Shiv Thakare: शिव ठाकरेला पाहून वेडे झाले चाहते,चार-चार बॉडिगार्डस असूनही घोळक्याला आवरणं झालं कठीण )
दरम्यान पारनेर तालुक्यातील जवळे येथे पैलवान जयदीप सालके आणि सौरव लोखंडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त लावणी नृत्यांगना गौतमी पाटील च्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रेक्षकांनी गौतमी पाटीलच्या अदाकारींवर ठेका धरत कार्यक्रमात धुडगूस घातला. यावेळी प्रेक्षक गौतमीच्या अदाकारींवर बेभान होऊन नाचले. तर काही प्रेक्षक कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामपंचायतने बांधलेल्या गाळ्यांवरती चढल्याने अनेक गाळ्यांचे पत्रे हि फुटले. त्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. आणि पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ पाहायला मिळाला..
नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा धिंगाणा #gautamipatilviralvideo #Gautamipatil #news18lokmat #EntertainmentNews pic.twitter.com/JaUWmJLQvT
— News18Lokmat (@News18lokmat) March 30, 2023
गौतमी पाटील नेहमीच कोणत्या कारणाने चर्चेत असते. आपल्या सौंदर्य आणि नृत्याच्या जोरावर गौतमीने लोकांना घायाळ केलं आहे. दरम्यान अनेकवेळा गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यातही सापडते. कधी आपल्या अश्लील हावभावांमुळे तर कधी लावणीच्या चुकीच्या स्टेप्स करत ती लोकांच्या निशाण्यावर येते. तिचा कोणताही कार्यक्रम वादविवादांशिवाय पार पडणं थोडं कठीणच आहे.
दरम्यान प्रसिद्ध कीर्तनकार इंदूरकर महाराज यांनी गौतमी पाटीलवर निशाणा साधत टोला लगावला होता. त्यांनी तिचं नाव न घेता म्हटलं होतं, 'तीन गाणी वाजवून ती तीन लाख घेते. आणि आम्ही कीर्तनासाठी पाच हजार जरी मागितले तरी आम्हाला लोक म्हणतात त्यांचं काय खरं नाही.. पैशांचा बाजार मांडलाय नुसतं'. अशाप्रकारे गौतमी सतत कोणाच्या ना कोणाच्या निशाण्यावर येत असते. शिवाय दुसरीकडे तिचा चाहतावर्गही मोठा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Gautami Patil