मुंबई, 25 मार्च- प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या नृत्याची क्रेझ आज संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर तर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमाला गर्दी ही होतीच. कधीकधी तर तिच्या कार्यक्रमात हाणामारी झाल्याची घटना देखील घडली आहे. सतत गौतमी पाटील सोशल मीडियावर कोणत्या कोणत्या कारणामुळं चर्चेत असते. आजकालची तरूण पोरं तर तिची एक झलक पाहण्यासाठी वाटेल ते करताना दिसतात. तिच्या डान्सची क्रेझ सोशल मीडियावर पाहायला मिळते. सध्या गौतमीच्या एका कार्यक्रमातला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात गौतमी पाटील डान्स करत असताना समोरून एका तरुणाने तसाच डान्स करून तिला जोरदार टक्कर दिली आहे. अगदी गौतमी पाटीलच्या डान्सला तोडीस तोड उत्तर देणारा डान्स करून त्याने नेटकऱ्यांचे मन जिंकलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
तरुणाचा गौतमी सारखा डान्स करण्याचा प्रयत्न
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या कोळपेवाडी येथील महेश्वर यात्रेच्या निमित्ताने गौतमीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. आता देखील तिच्या एका कार्यक्रमातील असाच एक भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे. या कार्यक्रमात गौतमी पाटील नाचत असताना मंचासमोर एका तरुणाने गौतमी सारखा डान्स करण्याचा प्रयत्न करुन गौतमीला टक्कर दिली. यावेळी गौतमी पाटील आणि या तरूणात चांगलीच जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळाली.
वाचा-मुंबईतील 'या' वास्तूशी हेमांगीचा आहे फार जवळचा संबंध; फोटो शेअर करत म्हणाली...
पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर जोरात डान्स
गौतमीच्या या कार्यक्रमांत पाटलांचा बैलगाडा गामं सुरु असताना अचानक एक तरुण डान्स करायला लागतो. अगदी गौतमी पाटीलच्या स्टेप्स फॉलो करत जशाच तसा डान्स करायला सुरूवात करतो. व्हिडिओत दिसतंय की, स्टेजवर गौतमी पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर जोरात डान्स सुरू आहे. तिला टक्कर देत हा तरुण स्टेजखाली नाचत आहे. एकीकडे गौतमीचं नृत्य पाहून सर्वजण तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धावपळ करतात तर दुसरीकडे तिला पाहून हा तरुण तिच्या सारखा डान्स करत आहे. दोघांच्या या डान्सची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली आहे.
पोलिसांना करावा लागला सौम्य लाठीचार्ज
नगर जिल्ह्यातील महेश्वर यात्रेच्या निमित्ताने गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठिकठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी आणि राड्याचा अनुभव पाहता सुरुवातीला गौतमी येण्याचे मेसेज व्हायरल झाल्यानंतर आयोजकांच्या वतीने शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली.
मात्र तरीही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गर्दी आणि गोंधळ झालाच असून पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.गौतमीचा लवकरच 'घुंगरू' नावाचा चित्रपट येतो आहे. या चित्रपटाचे शूटिंग थायलंडमध्ये पार पडले. याशिवाय सोलापूर, माढा, हंपी या ठिकाणीही चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती बाबा गायकवाड यांनी केली आहे. तेच या चित्रपटात गौतमीसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचे म्हटले जाते आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.