मुंबई, 5 जुलै : अभिनेता शाहरुख खान फक्त भारतातच नाही तर परदेशातही सुपरस्टार मानला जातो. जगभरातील सर्वांधिक कमाई करणारा अभिनेता म्हणून शाहरुखचं नाव घेतलं जातं. त्याची पत्नी गौरी खान सुद्धा एक यशस्वी बिझनेस वुमन आहे. गौरी एक इंटीरिअर डिझायनर असून बॉलिवूडमधील अनेक नामवंत व्यक्तींच्या घरांचं इंटीरिअर डिझाइन गौरीनं केलेलं आहे. त्यानंतर गौरीनं नुकतंच पुण्यात 'ग्रॅविटस' नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं. त्यावेळी तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुखची पत्नी असण्याचे काय तोटे आहेत यावर चर्चा केली.
नुकत्याच आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत गौरी म्हणाली, ‘शाहरुखची पत्नी असण्याच्या अनेक सकारात्मक बाजू आहेत आणि मी त्या सर्वांचा स्वतःला फायदा करून घेते. पण नकरात्मक गोष्टींवर जास्त लक्ष देत नाही.’ गौरी पुढे म्हणाली, ‘शाहरुखची पत्नी असण्याच्या काही नकारात्मक बाजू असतील तर त्यांच्यावर दुर्लक्ष करते. शाहरुखनं मला गौरी खान डिझाइन लाँच करण्यात मदत केली. तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यानं आमच्या कुटुंबासाठी खुप काही केलं आहे. त्यामुळे तो चांगला पिता आणि पती दोन्ही आहे. त्यामुळे त्याची पत्नी असण्याच्या नात्यानं त्याच्या बद्दल मला कोणत्याही नकारात्मक गोष्टी शेअर करू शकत नाही.’
कियारा अडवाणी की तारा सुतारिया, सिद्धार्थ मल्होत्रा नक्की कोणाला करतोय डेट?
गौरी सांगते, ‘मला वाटतं, मी सुपरस्टारची पत्नी असले तरी, मी खूप सामान्य जीवन जगते. जशी एक वर्किंग वूमन जगते. माझ्या कामासाठी मला जेवढ्या सोशल मीडियाच्या वापराची गरज असते. तेवढंच मी ते वापरते. मला वाटतं, तुम्हाला जर तुमचं काम लोकांना दाखवायचं असेल तर मग सोशल मीडिया तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. याशिवाय मी खूप कमी वेळा स्पॉटलाइटमध्ये असते.’
प्रभासच्या Saaho मध्ये सलमान खानची फेवरेट अभिनेत्री करणार आयटम साँग
शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर शाहरुखनं शेवटचं मागील वर्षी ‘झीरो’ सिनेमात काम केलं होतं. त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही त्यानंतर अद्याप शाहरुखनं कोणताही सिनेमा साइन केलेला नाही.
मलायका-अर्जुननं घेतली ऋषी कपूर यांची भेट, नीतू कपूर म्हणतात...
===========================================================
SPECIAL REPORT: 'वामन हरी पेठे'मधून 58 किलो सोनं मॅनेजरनेच केले लंपास!