मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Koffee with Karan 7 : आर्यन खानच्या अटकेनंतर अखेर गौरीने सोडलं मौन; करणच्या शोमध्ये केला मोठा खुलासा

Koffee with Karan 7 : आर्यन खानच्या अटकेनंतर अखेर गौरीने सोडलं मौन; करणच्या शोमध्ये केला मोठा खुलासा

Gauri Khan in koffee with karan7

Gauri Khan in koffee with karan7

'कॉफी विथ करण 7' मध्ये आगामी भागात प्रेक्षकांना गौरी पहायला मिळणार आहे.गौरी खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकला होता. आता त्यावर गौरीने या शोमध्ये मौन सोडलं आहे.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 22  सप्टेंबर : करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विथ करण 7' प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. प्रत्येक आठवड्यात नवीन स्टार्स शोमध्ये येतात, जे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलतात. अनेकवेळा स्टार्स शो दरम्यान काहीतरी बोलतात, जो चर्चेचा विषय बनतो. शोचे आतापर्यंत 1१ एपिसोड आले आहेत ते सगळे लोकप्रिय ठरले आहेत. आता नवीन एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. यावेळी या शो मध्ये गौरी खान गुरुवारी 17 वर्षांनी कॉफी काऊचवर परतली आहे. गौरी खान इंटीरियर डिझायनर आणि बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानची पत्नी आहे.  गौरी खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकला होता. आता त्यावर गौरीने या शोमध्ये मौन सोडलं आहे. आर्यन खानला गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी ड्रग्ज घेतल्याप्रकरणी अटक केली होती. आर्यन बराच काळ तुरुंगात होता आणि याच काळात खान कुटुंबही वाईट काळातून जात होते. या शोमध्ये गौरी खनसमोर आर्यनच्या अटकेवर बोलताना करण जोहर म्हणाला- ''फक्त व्यावसायिकच नाही तर वैयक्तिकरित्या कुटुंबातील सदस्य म्हणून तुमच्यासाठी हा कठीण काळ होता. यातून तुम्ही सर्वजण खंबीरपणे बाहेर आला आहात. मला माहित आहे की ते सोपे नव्हते.''
View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

तो पुढे म्हणाला, ''मी तुला एक आई म्हणून चांगलं ओळखतो आणि आपण  सर्व एकाच कुटुंबातील सदस्य आहोत. मला असे वाटते की, हे सोपे नव्हते.  पण गौरी, मी तुला सगळ्यांपेक्षा या सगळ्या प्रकरणातून जास्त ताकदीने बाहेर येताना पाहिले आहे. जेव्हा कुटुंब अशा परिस्थितीतून जातं तेव्हा हा कठीण प्रसंग हाताळण्याच्या तुझ्या  पद्धतीबद्दल तुझं काय म्हणणं आहे?'' हेही वाचा - Tejasswi Prakash : आधी आलिशान कार आणि आता गोव्यात घर; इतक्या कमी वयात तेजस्वीच्या कमाईची होतेय चर्चा यावर गौरी खान म्हणाली, 'होय, एक कुटुंब म्हणून आम्ही यातून गेलो आहोत... मला वाटतं एक आई म्हणून, पालक म्हणून, आम्ही जे काही अनुभवलं आहे, त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. पण आज आपण जिथे एक कुटुंब म्हणून उभे आहोत तिथे मी म्हणू शकतो की आपण चांगल्या ठिकाणी आहोत. जिथे आपल्याला सर्वांबद्दल प्रेम वाटतं. आमच्या सर्व मित्रांकडून आणि आम्ही ओळखत नसलेल्या अनेक लोकांचे मेसेज आणि प्रेम आम्हाला या काळात मिळालं त्यासाठी मला खूप धन्य वाटते. आणि मी म्हणेन की या काळात ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांची मी ऋणी आहे.' दरम्यान, आगामी भागाचा प्रोमो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. खूप कालावधीपासून प्रेक्षक गौरी खानची वाट पाहत आहेत. अखेर आगामी भागात प्रेक्षकांना गौरी पहायला मिळणार आहे. गौरी खान करण जोहरच्या चॅट शोच्या 12 व्या एपिसोडमध्ये महीप कपूर आणि भावना पांडे यांच्यासोबत दिसणार आहे. त्यामुळे शोचा प्रोमो पाहिल्यानंतर चाहते एपिसोडसाठी खूप उत्सुक आहेत. 'कॉफी विथ करण 7' चा 11 वा भाग गुरुवारी रात्री 12 वाजता Disney Plus Hotstar वर प्रसारित होणार आहे.
First published:

Tags: Bollywood, Entertainment, Karan Johar, Shahrukh khan

पुढील बातम्या