Home /News /entertainment /

क्वारंटाईनमध्ये लेकीकडून मेकअप टिप्स घेतेय गौरी खान, Photo शेअर करुन म्हणाली...

क्वारंटाईनमध्ये लेकीकडून मेकअप टिप्स घेतेय गौरी खान, Photo शेअर करुन म्हणाली...

कोरोना व्हायरसमुळे सध्या सुहाना मागच्या काही दिवसांपासून सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे.

  मुंबई, 31 मार्च : शाहरुख खानची मुलगी सुहाना कान नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते. तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेला कोणताही फोटो सोशल मीडियावर सर्रास व्हायरल झालेला दिसतो. परदेशात राहून पोस्ट ग्रॅज्युएशन करत असलेली सुहाना सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये तिची आई गौरी खानसुद्धा लॉकडाउनमुळे घरी आहे. अशात सुहाना आणि गौरी खाननं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये सुहाना खान न्युड मेकअपमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत आहे. सुहानाचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर गौरी खाननं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'लर्निंग मेकअप...' तर सुहानानं तिच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'एक्सपेरीमेंट' यावरुन समजतं की सध्या मोकळ्या वेळेत दोघीही मेकअपवर एक्सपेरीमेंट करत आहेत. अशात सुहाना आपल्या आईला मेकअप टिप्स देत आहे. कनिका कपूरबाबत नवी माहिती आली समोर, डॉक्टरांनी सांगितली सत्य परिस्थिती
  View this post on Instagram

  Learning.... make up tips @suhanakhan2 #indoor #activity ..

  A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

  View this post on Instagram

  Experimenting

  A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

  कोरोना व्हायरसमुळे सध्या सुहाना मागच्या काही दिवसांपासून सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. त्यामुळे सध्या ती तिच्या मोकळ्या वेळेत मेकअपवर वेगवेगळे एक्सपीरिमेंट करताना दिसत आहे. याआधीही तिनं काही फोटो शेअर केले होते. ज्यात ती मेकअप करून वेगवेगळे एक्सप्रेशन देताना दिसली होती. काजोल आणि न्यासाला कोरोना झाल्याच्या चर्चा, अजय देवगणनं ट्विटरवरून सांगितलं सत्य
  View this post on Instagram

  A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

  सुहाना खाननं तिच्या या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं एक इमोजी पोस्ट केला होता. ज्यावरुन ती सेल्फ आयसोलेशनमध्ये खूपच कंटाळली असल्याचं समजत होतं. सुहाना खान सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही मात्र तिच्या फॅनपेजवर मात्र अनेकदा तिचे वेगवेगळे फोटो व्हायरल होत असतात. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच सुहानाचे सोशल मीडियावर बरेच चाहते आहेत. स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर वर्षभरातच घेणार घटस्फोट?
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Suhana khan

  पुढील बातम्या