मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

गौरी खानला अश्रू अनावर; लेकाला अशा अवस्थेत पाहून गाडीत ढसाढसा रडली

गौरी खानला अश्रू अनावर; लेकाला अशा अवस्थेत पाहून गाडीत ढसाढसा रडली

क्रुझ शिपवरील ड्रग्ज प्रकरणात (Drugs Party) अटकेत असलेला आर्यन खान याला आज मुंबई कोर्टाने जामीन  (Mumbai Court rejects bail applications of Aryan Khan) देण्यास नकार दिला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 8 ऑक्टोबर : क्रुझ शिपवरील ड्रग्ज प्रकरणात (Drugs Party) अटकेत असलेला आर्यन खान याला आज मुंबई कोर्टाने जामीन  (Mumbai Court rejects bail applications of Aryan Khan) देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुढील 14 दिवस शाहरूख खान याचा सुपूत्र आर्यन खान याला न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे.

आज आर्यन खान याची आई गौरी खान हिचा वाढदिवस (Gauri Khan's Birthday) आहे. आज तरी मुलगा घरी यावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. आर्यन खान याचे वकील सतिश मानशिंदे यांनीदेखील कोर्टात त्याला जामीन मिळावा यासाठी प्रयत्न केले. मात्र कोर्टाने आर्यन खानसह त्याच्या मित्रांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

यापूर्वीदेखील आर्यनचा जामीन अर्ज किल्ला कोर्टानं दोनदा फेटाळला आहे. परिणामी मुलाची परिस्थिती पाहता त्याची आई गौरी खान (Aryan Khan's mother Gauri Khan) हिला स्वत:ला सांभाळणं कठीण झालं आहे.

यासंदर्भातील एक व्हिडीओ समोर आला आहे. जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर आर्यन खान याला धक्का बसला. त्यानंतर आर्यनला एनसीबीचे अधिकारी कोर्टातून बाहेर आणताना दिसत आहे. त्याशिवाय समोर एक कार उभी आहे. त्यात गौरी खान रडताना दिसत आहे. बराच वेळ ती डोळ्यांवर हात ठेवून गाडीत शांत बसल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. (Gauri Khan cried in the car when she saw son aryan khan arrested)

हे ही वाचा-Big News : आईच्या वाढदिवशी घरी जाऊ शकणार का आर्यन खान? कोर्टाचा मोठा निर्णय

बॉलिवूडसंदर्भातील बातम्या देणाऱ्या एका फेसबुक पेजनं यासंदर्भातील व्हिडीओ शेअर केला आहे.

शेवटच्या दृश्यात गौरी कारमध्ये बसून रडताना दिसत आहे. काही वेळाने एक महिला आणि पुरुष कारमध्ये येऊन बसतात आणि गाडी पुढे निघून जाते.

First published:

Tags: Aryan khan, Drugs, NCB, Shahrukh khan