लग्नाच्या 6 महिन्यानंतर गौहर खानने पती जैद दरबारचं प्रेम, आपलं काम आणि आपलं लग्न यासर्व गोष्टींची तुलना केली आहे. ‘कॉफी टाईम विथ ग्रीहा’ मध्ये गौहरने आपल्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. खुलासा करत गौहर खानने म्हटलं आहे, ‘जैदने मला म्हटलं होतं. मी तुझ्यासाठी तुझ्या कामाचा सर्व शेड्युल सांभाळून घेईन. मात्र लग्नामध्ये तू हातावर मेहंदी काढायची. मेहंदी नाही काढलीस तर मी हे लग्न कॅन्सल करेन’. जैदची प्रचंड इच्छा होती, की गौहरने आपल्या लग्नात हातावर सुंदर मेहंदी काढावी.View this post on Instagram
गौहरने पुढे म्हटलं की, ‘तिला मेहंदी लावायची नव्हती. कारण तिला लग्नाच्या दुसऱ्या दिवशीचं ‘चौदा फेरे’ च्या शुटींगसाठी मुंबईला जायचं होतं. मात्र जैदने मला या दिवसांमध्ये खूप समजून घेतलं आहे. आणि मला खूप सहकार्यदेखील केल आहे. तो स्वतः माझ्यासोबत लग्नाच्या दुसऱ्या दिवशी शुटिंगसाठी मुंबईला आला. कारण मी एक नवी नवरी होते. आणि म्हणूनचं जैद माझ्यासोबत आला होता. तो नेहमीचं मला खुपचं सहकार्य करतो’. (हे वाचा: Shocking: नोरावर भडकली भारती सिंग; स्टेजवरून फरफटत केलं बाहेर) तसेच गौहर म्हणते, ‘माझ्यासाठी अल्लाहने जे योजलं होतं ते ठीकचं होतं. कारण ‘चौदा फेरे’ मध्ये मला सर्व लग्नाचेच सीन द्यायचे होते. त्यामुळे मला मेहंदीची काहीच अडचण आली नाही. आणि ‘चौदा फेरे’ चित्रपटात माझ्या हातावर जी मेहंदी आहे, ती माझ्या लग्नाची आहे’.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment