'हिजाब घालून वर्कआऊट करतेस का?' पायल रोहतगी आणि गौहर खानमध्ये रंगलं ट्विटवॉर

'हिजाब घालून वर्कआऊट करतेस का?' पायल रोहतगी आणि गौहर खानमध्ये रंगलं ट्विटवॉर

नुकतंच पायलनं कलम 370 बाबत एक ट्वीट केलं आणि त्याला अभिनेत्री गौहर खाननं प्रतिक्रिया दिल्यानंतर या दोघींमध्ये ट्वीटर वॉर सुरू झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 1 एप्रिल : 'बिग बॉस' रिअ‍ॅलिटी शोची स्पर्धक पायल रोहतगी आणि वाद हे समीकरणच झालं आहे. पायल नेहमीच तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. विशेषतः तिचे ट्वीट्स अनेकदा वादाचं कारण बनतात. नुकतंच पायलनं कलम 370 बाबत एक ट्वीट केलं आणि त्याला अभिनेत्री गौहर खाननं प्रतिक्रिया दिल्यानंतर या दोघींमध्ये ट्वीटर वॉर सुरू झालं आहे.  कलम 370 मुळे जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा प्राप्त झालेला आहे.

'कलम 370 जर काढून टाकता येत नसेल तर काश्मिरी मुस्लिमांना तिथून बाहेर पडायला सांगा. केंद्र सरकारनं या क्षेत्राला संरक्षित भाग बनवायला हवं आणि काश्मिरी लोकांनी भारतातील दुसऱ्या शहरांमध्ये जाऊन राहायला सुरुवात करायला हवी. काश्मीर भारताचा एक भाग आहे मग त्या ठिकाणी काश्मिरी असो वा नसो. तुम्ही तिथल्या ब्राह्मणांना बाहेर काढलं आहे, तर मग आता मुस्लिमांना बाहेर काढा.' असं ट्वीट पायलनं केलं होतं. यावर गौहर खान यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

पायलच्या ट्वीटवर उत्तर देताना गौहरनं लिहिलं की ,' हाहाहा... ही गोष्ट अशी व्यक्ती बोलत आहे जी स्वतः 90% मुस्लीम लोकांमध्ये आनंदाने राहत आहे. मला त्या मुस्लीम लोकांवर गर्व आहे, जे तुझ्या बिल्डिंगमध्ये राहतात आणि तुला सहन करतात.' गौहर फक्त एवढंच बोलून थांबली नाही तिनं पुढे असंही लिहिलं की, 'अनेक ठिकाणी मुस्लीम लोकांना राहण्यासाठी घरं दिली जात नाही. द्वेष पसरवणं खूप सोपं आहे. अशा गोष्टींची लाज वाटते. आपला भारत देश  विविधतेमुळे सुंदर आहे. मग जे लोक तोच देश विभागण्याची भाषा करतात त्यांना लाज वाटली पाहिजे'.

गौहरच्या उत्तरावर शांत राहील ती पायल कसली?. तिनंसुद्धा गौहरच्या ट्वीटला उत्तर दिलं आणि त्यांच्यामध्ये तुफान ट्वीटर वॉर सुरू झालं. गौहरला उत्तर देताना, 'मुस्लीम आंटीजी एक रिअ‍ॅलिटी शो जिंकण्यासाठी फेमिनिस्ट कार्ड वापरते. ती एका हिंदू मुलासोबत एका अयशस्वी नात्यात होती आणि तिनेच हे नातं अयशस्वी असल्याचं सांगते. ती माझ्या बिल्डिंगमधील लोकांना ओळखते. तर तिला हेसुद्धा माहीत असायला हवं की मी माझ्या घराची मालकीण आहे. तू हिजाब घालून वर्कआऊट करतेस का? कारण माझ्या बिल्डिंगमधील मुस्लीम महिला तसं करतात.'

First published: April 1, 2019, 9:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading