Home /News /entertainment /

गौहर खानच्या हातात रंगली झैदची मेहंदी, PHOTO सोशल मीडियावर VIRAL

गौहर खानच्या हातात रंगली झैदची मेहंदी, PHOTO सोशल मीडियावर VIRAL

गौहर खान (Gauahar Khan) आणि झैद दरबार (Zaid Darbar) यांचा उद्या निकाह होणार आहे. गौहरने नुकतीच झौहरच्या नावाची मेहंदी लावली असून तिने तिच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत.

  मुंबई, 25 डिसेंबर: बिग बॉस (Bigg Boss 7) ची विजेती गौहर खान (Gauahar Khan) झैद दरबार बरोबर (Zaid Darbar) लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. लग्नाच्या 1 दिवस आधी गौहरने तिच्या मेहंदीचे (Mehandi) फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गौहरने आपल्या हातावर झैद दरबारच्या नावाची मेहंदी काढली आहे. या पोस्टमध्ये गौहरच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. गौहरच्या या पोस्टवर अगदी काही तासातच लाखो लाईक्स (Likes) मिळाले आहेत. गौहर खान (Gauahar Khan) आणि झैद दरबार 25 डिसेंबर (25 December) रोजी लग्न बंधनात अडकणार आहे. खान आणि दरबार या दोन्ही कुटुंबात उत्सवाचे वातावरण आहे. लग्नाच्या विधी सुरू झाल्या आहेत.जैद आणि गौहर यांनी आपल्या वेडिंगचे  नाव गाझा असे ठेवले आहे. गौहर खान यांनी फोटो शेअर केलेल्या या पोस्ट मध्ये लिहिले आहे, "मेहंदी की रात आयी ... माझ्या प्रिये,धन्यवाद मी परिधान केलेल्या या सुंदर भेटबद्दल". गौहर सांगते ही भेट मला 4 वर्षांपूर्वी माझ्या भावाने दिली होती. तो  लग्नाला येऊ शकणार नाही, परंतु त्याने या ड्रेस मधून त्याचे प्रेम पाठवले आहे. या मोठ्या दिवसासाठी त्याने पाठवलेला आशीर्वाद मला मिळाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. शेअर केलेल्या या फोटोत गौहरने पिवळ्या रंगाचा सूट परिधान केलेला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

  गौहर आणि जैदने  लग्नापूर्वी क्ले आर्टिस्ट कडून  मातीचे छाप बनून घेतले आहेत, काही दिवसापूर्वीच  गौहरने  या छापाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. त्यांनी हा छाप लग्नाच्या तारखेसह फ्रेम  केला आहे. गौहरच्या या पोस्टवरही तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कंमेंट्स चा पाऊस पडला होता.
  View this post on Instagram

  A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

  यापूर्वी गौहर आणि जैद दोघांनीही  चिक्सा सेरेमनीचे फोटो  सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोत  गौहर आणि जैद पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये खूप आनंदी दिसत होते. दोघांनीही फोटोला सारखं  कॅप्शन दिला होता.
  View this post on Instagram

  A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

  गौहर आणि जैद उद्या मुंबईतील आयटीसी मराठा लक्झरी हॉटेलमध्ये  लग्न करणार आहेत. या लग्नाला गौहर आणि झैदच्या कुटुंबातील  जवळचे नातेवाईक आणि काही जवळचे मित्र सहभागी होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bollywood, Social media, Social media viral

  पुढील बातम्या