VIDEO नवविवाहित गौहर खानला विमानात भेटला ‘तो’; म्हणाला, ‘काय हे माझं नशीब...’

VIDEO नवविवाहित गौहर खानला विमानात भेटला ‘तो’; म्हणाला, ‘काय हे माझं नशीब...’

नवविवाहिता गौहर (Gauahar Khan) खानशी नुकतीच एका व्यक्तीशी भेट झाली. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, काय हे माझं नशीब. कोण होती ती व्यक्ती? वाचा

  • Share this:

मुंबई, 28 डिसेंबर: गौहर खान (Gauahar Khan) आणि झैद दरबार (Zaid Darbar) यांचं लग्न नुकतंच पार पडलं. लग्नाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत पण गौहर खानच्या आयुष्यात लग्नानंतर असा एक प्रसंग घडला की, नशीबावर हसावं की रडावं असा प्रश्न तिला आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंड कुशाल टंडनला (Kushal Tondon) पडला.

झालं असं की, गौहर खान निकाह झाल्यानंतर लगेचच तिच्या कामासाठी निघाली. यावेळी फ्लाइट पकडताना नेमका त्याच फ्लाइटमध्ये गौहर खानचा एक्स बॉयफ्रेंड कुशाल टंडन तिला दिसला. त्या दोघांचा एकमेकांकडे बघून जरा धक्काच बसला. शेवटी त्या धक्क्यातून सावरत कुशाल टंडनने तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. विमानातला त्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये कुशाल तिला लग्नाच्या शुभेच्छा देत आहे आणि पुढे 'हाय किस्मत' असंही म्हणत आहे.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

बिग बॉस 7 ची विजेती ठरलेली गौहर खान (Gauahar Khan) आणि टीकटॉकर झैद दरबार (Zaid Darbar) हे 25 डिसेंबर लग्नबंधनात अडकले. म्यूझिक कंपोझर इस्माइल दरबार (Ismail Darbar) यांचा मुलगा आणि प्रसिद्ध टिकटॉकर झैद दरबारला (Zaid Darbar) डेट करण्याच्या चर्चा काही महिन्यांपूर्वीच सुरू झाल्या होत्या. मुंबईच्या एका पॉश हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.

View this post on Instagram

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

झैद गौहर खानपेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. गौहर खान आणि अभिनेता कुशाल टंडन दीर्घकाळासाछी रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यांचं नातं टिकलं नाही. कुशालदेखील बिग बॉस प्रतिस्पर्धी होता. शोमध्ये देखील त्यांची केमिस्ट्री दिसून यायची पण त्यांनी कालांतराने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 28, 2020, 10:57 AM IST

ताज्या बातम्या