Home /News /entertainment /

Imlie: गश्मीर महाजनीने सोडली मालिका! समोर आलं मोठं कारण

Imlie: गश्मीर महाजनीने सोडली मालिका! समोर आलं मोठं कारण

'इमली' (Imlie) या हिंदी मालिकेने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

    मुंबई, 26 जानेवारी-   'इमली'   (Imlie)  या हिंदी मालिकेने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. मालिका नेहमीच टीआरपी (TRP)  रेसमध्ये टॉप 5   (Top 5)  मध्ये असते. मालिकेत दररोज येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. मालिकेत दोन अभिनेत्री आणि एक अभिनेता असं कथानक आहे. परंतु नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेता गश्मीर महाजनीने   (Gashmeer Mahajani)   ही मालिका सोडल्याचं सांगितलं जात आहे. स्टार प्लसवर 'इमली' ही मालिका आपल्या भेटीला येते. मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेत सुमबुल तौकीर खान आणि मयुरी देशमुख या मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहेत. तर गश्मीर महाजनी मुख्य अभिनेता आहे. या तिघांनी अनुक्रमे इमली, मालिनी आणि आदित्य त्रिपाठी ही भूमिका साकारली आहे. या तिघांच्याभोवती फिरणारं कथानक प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे. प्रत्येक आठवड्यात ही मालिका टॉप 5 मध्ये आपलं स्थान बनवण्यात यशस्वी होते. या मालिकेमुळे कलाकरांना एक खास ओळख मिळाली आहे. असं असताना अचानक गश्मीर महाजनीने मालिका सोडल्याचं समोर आलं आहे. गश्मीर महाजनीने ही मालिका सोडल्यानंतर त्याचे चाहते नाराज झाले आहेत. तसेच सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु आहेत. गश्मीरने ही मालिका का सोडली यावर विविध शोध लावले जात आहेत. असं म्हटलं जात आहे की, अभिनेत्याला आगामी मोठा प्रोजेक्ट हाती लागल्याने त्यानं ही मालिका सोडली आहे. तर दुसरीकडे असंही म्हटलं जात आहे की,प्रॉडक्शन हाऊसवर नाराज होऊन गश्मीरने ही मालिका सोडली आहे. (हे वाचा:कुटुंबाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही सिद्धार्थ शुक्लाचं नाव) परंतु इ टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने याचा खुलासा केला आहे. याबद्दल बोलताना गश्मीर महाजनीने सांगितलं की, 'मालिका सोडण्याचं कारण निर्माता गुल खान आणि माझ्यामध्ये आहे. ते कायम आमच्यामध्येच राहील. तसेच गश्मीर म्हणाला, 'मी आणि गुल खानने भविष्यातसुद्धा एकत्र काम करण्याचं ठरवलं आहे'. तसेच अभिनेत्याने रागात येऊन मालिका सोडल्याच्या अफवांचं खंडन केलं आहे.तसेच अभिनेत्याने सांगितलं मालिकेला देण्यासाठी माझ्याकडे डेट्स नव्हत्या यासुद्धा निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Tv actor

    पुढील बातम्या