• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘धर्म म्हणजे काय मला शिकवू नका’; मुलाची शेंडी खेचणारा अभिनेता ट्रोलर्सवर संतापला

‘धर्म म्हणजे काय मला शिकवू नका’; मुलाची शेंडी खेचणारा अभिनेता ट्रोलर्सवर संतापला

मुलाची शेंडी खेचली म्हणून अभिनेत्यावर होतेय जोरदार टीका; अखेर ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर...

 • Share this:
  मुंबई 11 एप्रिल: गश्मीर महाजनी हा मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. अभिनयासोबतच तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. अलिकडेच त्यानं आपल्या मुलासोबतचे काही क्यूट फोटो शेअर केले होते. मात्र हे फोटो पाहून काही नेटकरी संतापले आहेत. तो हिंदू धर्माचा अपमान करतोय अशी टोकाची टीकाही काही नेटकऱ्यांनी त्याच्यावर केली. अखेर त्यानं देखील “धर्म म्हणजे काय मला शिकवू नका” अशा खणखणीत शब्दात ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं. नेमकं प्रकरण काय आहे? गश्मीरनं फेसबुकवर आपल्या मुलासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यात गश्मीर आणि त्याचा मुलगा दोघांनीही पांढरं धोतरं नेसलं आहे. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आहेत. गश्मीरचा दोन वर्षांचा मुलगा व्योम याचं टक्कल केलेलं असून एक शेंडी मात्र दिसत आहे. एका फोटोत गश्मीर ही शेंडी ओढताना दिसत आहे. यावरुनच अनेकांना आक्षेप असल्याचं दिसून आलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी आपला आक्षेप नोंदवला आहे. टीकाकारांनी या फोटोचा संबंध मुंज या धार्मिक विधीशी जोडला आहे. त्यानं आपल्या मुलाची शेंडी ओढून या विधिचा अपमान केलाय की काय? अशी शंका काही नेटकऱ्यांनी घेतली.
  अखेर वाढत्या टीकेला वैतागून त्यानं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “मुळात ही त्याची शेंडी नाही. तो फक्त दोन वर्षांचा आहे. त्याची मुंज झालेली नाही. उन्हाळा म्हणून केस कापले आहेत. बापाला आपल्या मुलाची शेंडी ओढण्याचा पूर्ण अधिकार असतो. पण आपण बहुतेक आपल्या धर्माचे शिलेदार आहात. पूर्ण माहिती नसताना बेजबाबदार कमेंट करु नका.” अशा शब्दात त्यानं टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. गश्मीर लवकरच प्रेक्षकांना सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: