Home /News /entertainment /

गंगूबाई काठियावाडीच्या मुलाची कोर्टात धाव; आलिया भट्ट, संजय लीला भन्साळीवर धक्कादायक आरोप

गंगूबाई काठियावाडीच्या मुलाची कोर्टात धाव; आलिया भट्ट, संजय लीला भन्साळीवर धक्कादायक आरोप

गंगूबाई यांच्या मुलाने चित्रपटाच्या टीमवर धक्कादायक आरोप केले आहेत.

    मुंबई, 24 मार्च : चित्रपट अभिनेत्री आलिया भट्ट, दिग्दर्शक संजय लीला भंन्साली आणि या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे लेखकाला मुंबईतील माझगाव हायकोर्टाने समन्स पाठवलं आहे. गंगूबाई काठियावाडी चित्रपटासंदर्भात हे समन्स जारी करण्यात आलं आहे. 21 मे रोजी त्यांना कोर्टात हजर राहाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याचिकाकर्त्यांनी आरोप केला आहे की, गंगूबाई काठियावाडी चित्रपटात त्यांच्या कुटुंबाची बदनामी केली जात आहे. याचिकाकर्ता हा गंगूबाई काठियावाडी यांचा मुलगा असून त्यांनी हा चित्रपट तथ्यहीन असल्याचा दावा केला आहे. चित्रपटामुळे त्यांच्या कुटुंबाची बदनामी केली जात असल्याचंही त्याने याचिकेत म्हटलं आहे. (Gangubai Kathiawadis son in court Shocking allegations against Alia Bhatt Sanjay Leela Bhansali ) हे ही वाचा-अंकिता लोखंडेने पहिल्यांदाच ब्रेकअपबाबत सोडलं मौन,सुशांतपासून का झाली होती वेगळी काही दिवसांपूर्वी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटावरुन आणखी एक बातमी समोर आली होती. कामाठीपुरा येथे काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेनं या चित्रपटाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. कामाठीपुरा येथे कुठलेही अवैध्य व्यवहार केले जात नाहीत. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या माध्यमातून कामाठीपुराबाबत खोटी माहिती पसरवली जात आहे. मोठे प्रयत्न करुन या ठिकाणच्या नागरिकांनी आपली चुकीची प्रतिमा बदलली आहे. मात्र या चित्रपटामुळं लोकांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवलं जाणार आहे. या चित्रपटामुळं कमाठीपुराचं वर्तमानच नव्हे तर भविष्यदेखील धोक्यात येईल, असे आरोप या संस्थेनं चित्रपटावर केले आहेत. यापूर्वी गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. शिवाय संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि हुसेन झैदी यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला होता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Alia Bhatt, Movie release

    पुढील बातम्या