Gangubai Kathiawadi : आलिया भटचा नवा अवतार, माफिया क्वीनचा फर्स्ट लुक रिलीज

Gangubai Kathiawadi : आलिया भटचा नवा अवतार, माफिया क्वीनचा फर्स्ट लुक रिलीज

‘राझी’नंतर आलिया पुन्हा एकदा नायिकाप्रधान सिनेमात मात्र एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी : अभिनेत्री आलिया भट सध्या तिचा आगामी सिनेमा ‘गंगुबाई काठियावाडी’मुळे खूप चर्चेत आहे. ‘राझी’नंतर आलिया पुन्हा एकदा नायिकाप्रधान सिनेमात मात्र एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. मंगळवारी(14 जानेवारीला) या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झालं होतं. त्यानंतर आता या सिनेमातील आलिया भटचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे.

संजय लीला भन्साळी यांचं दिग्दर्शन असलेला ‘गंगुबाई काठियावाडी’ मुंबईतील माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगुबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. अभिनेत्री आलिया भट या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार असून या सिनेमातील तिचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाला.

हार्दिक पांड्याच्या प्रेयसीने शेअर केला बिकिनीतला फोटो, सोशल मीडियावर झाला हीट

 

View this post on Instagram

 

Here she is, Gangubai Kathiawadi 🌹 #SanjayLeelaBhansali @prerna_singh6 @jayantilalgadaofficial @bhansaliproductions @penmovies

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

आलियानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या सिनेमाचं फर्स्ट पोस्टर शेअर केलं आहे. ज्यात ती दोन वेण्या घातलेल्या एका नुकत्याच वयात आलेल्या मुलीच्या वेशात दिसत आहे. याशिवाय तिच्या बाजूच्या टेबलवर बंदूकही दिसत आहे. आलियाचा हा लुक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

Oscar Award ची नामांकनं जाहीर, यंदा ‘जोकर’चा दबदबा

‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमासाठी संजय लीला भन्साळी यांनी सुरुवातीला प्रियांका चोप्राला कास्ट केल्याच्या चर्चा झाल्या होत्या मात्र नंतर या सिनेमासाठी आलियाचं नाव फायनल करण्यात आलं. गंगुबाई या एकेकाळी मुंबईतील सर्वात चर्चेत राहिलेल्या महिला आहेत. ज्यांना नाइलाजानं वेश्या व्यवसाय करावा लागला होता.

'आईचा पदर तो आईचाच, त्याला दुसऱ्या कशाची सर नाही', बिग बी झाले भावुक

दरम्यानच्या काळात त्या मुंबईतील काही कुख्यात गुन्हेगारांच्या संपर्कात आल्या आणि त्यानंतर त्या मुंबईतील माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. आलियानं याआधी नायिकाप्रधान भूमिका साकारल्या असल्या तरीही तिनं या प्रकारची भूमिका या अगोदर केलेली नसल्यानं तिच्यासाठी ही भूमिका बरीच आव्हानात्मक असणार आहे. हा सिनेमा 20 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2020 09:51 AM IST

ताज्या बातम्या