मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

यंदा सलमान खान 'या' कारणामुळे गणपती उत्सवात होणार नाही सहभागी

यंदा सलमान खान 'या' कारणामुळे गणपती उत्सवात होणार नाही सहभागी

सलमान खान (Salman khan ganpati bappa) देखील प्रत्येकी वर्षी मोठ्या थाटात सर्व घरच्या मंडळीसोबत गणपती उत्सव साजरा करतो. यंदा मात्र सलमान खानला गणपती उत्सवात सहभागी होता येणार नाही

मुंबई, 9 सप्टेंबर: गणेशोत्सव (Ganesh chaturthi 2021) अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे.  सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.  बाजारपेठा देखील गणपतीसाठी लागणाऱ्या सजावटीच्या साहित्यांनी सजल्या आहेत.  सर्वसामान्या माणसापासून ते बॉलीवूड सेलेब्स (celebrity Ganesha) देखील गणपतीच्या  स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. काही  कलाकार मंडळी तयारीला देखील लागले आहेत. भाईजान सलमान खान (Salman khan ganpati bappa) देखील प्रत्येकी वर्षी मोठ्या थाटात सर्व घरच्या मंडळीसोबत गणपती उत्सव साजरा करतो. यंदा मात्र सलमान खानला गणपती उत्सवात सहभागी होता येणार नाही, कारण सलमान त्याच्या आगामी 'टाइगर 3' (Tiger 3) या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

Ganesh Chaturthi 2021: गौरी-गणपतीसाठी नटताना असा हवा मराठमोळा ठसका; पाहा मराठी साजाची Best Pairings

या सिनेमाचं चित्रीकरण सध्या ऑस्ट्रेलियात बायो बबलमध्ये  सुरू आहे. त्यामुळे सलमान यंदा गणपती उत्सवात सहभागी होऊ शकणार नाही.  सलमान खानची बहिण अर्पिता मात्र गणपती उत्सव नेहमीप्रमाणे यंदाही धुमधडाक्यात साजरा करणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, यंदाही सलमान खानच्या घरी दिड दिवसाच्या गणपचीची स्थापना करण्यात येणार आहे. सलमान भारताबाहेर असल्यामुळे यंदाच्या गणपती पूजेत सहभाही होऊ शकत नाही.

लालबागच्या राजाने भक्तांना दिलं पहिलं दर्शन; अमिताभ बच्चन यांनी शेयर केला VIDEO

यापूर्वी सलमान खान ने त्याच्या 'टाइगर 3' या सिनेमाचे चित्रीकरण रूस आणि तुर्कीमध्ये केले होते. या सिनेमात सलमान खान तसेच अभिनेत्री कटरीना कैफ, अभिनेता इमरान हाशमी  देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सलमानसोबत अभिनेत्री कटरीना कैफ, अभिनेता इमरान हाशमी  देखील ऑस्ट्रेलियात चित्रीकरण करत आहेत.

First published:

Tags: Ganesh chaturthi, Salman khan