मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'या सगळ्यामागे सरोज खान', गणेश आचार्यनं नाकारले महिला कोरिओग्राफरचे आरोप

'या सगळ्यामागे सरोज खान', गणेश आचार्यनं नाकारले महिला कोरिओग्राफरचे आरोप

गणेश आचार्यनं अडल्ट व्हिडीओ पाहण्यासाठी जबरदस्ती केल्याचा खळबळजनक आरोप या महिला कोरिओग्राफरनं केला होता.

गणेश आचार्यनं अडल्ट व्हिडीओ पाहण्यासाठी जबरदस्ती केल्याचा खळबळजनक आरोप या महिला कोरिओग्राफरनं केला होता.

गणेश आचार्यनं अडल्ट व्हिडीओ पाहण्यासाठी जबरदस्ती केल्याचा खळबळजनक आरोप या महिला कोरिओग्राफरनं केला होता.

मुंबई, 28 जानेवारी : बॉलिवूड सिनेमांच्या अभिनेत्यांना आपल्या इशाऱ्यावर नावणारे कोरिओग्राफर्स यांच्या नव्या आणि जुन्या संघटनेत वाद सुरू असतानाच आता कोरिओग्राफर गणेश आचर्य पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉलिवूडचा नावाजलेला कोरिओग्राफर म्हणून ओळखला जाणाऱ्या गणेश आचार्यवर एक महिला कोरिओग्राफरनं गंभीर आरोप केले होते. गणेश आचार्यनं अडल्ट व्हिडीओ पाहण्यासाठी जबरदस्ती केल्याचा खळबळजनक आरोप या महिला कोरिओग्राफरनं केला होता. यावर आता कोरिओग्राफर गणेश आचार्यनं प्रतिक्रिया दिली आहे.

ANI नं केलेल्या ट्विटनुसार, ‘मुंबईमधील 33 वर्षीय महिला कोरिओग्राफरनं इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशनचे महासचिव गणेश आचार्यच्या विरोधात राज्य महिला आयोग आणि अंबोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. या महिलेनं तिच्या तक्रारीत म्हटलं होतं की, गणेश आचार्य तिला या इंडस्ट्रीमध्ये काम मिळू देत नाही. तसेच कामाच्या बदल्यात तो कमिशन मागतो आणि यासोबतच जबरदस्तीनं अडल्ट व्हिडीओ पहायला लावतो.’

कशी आहे करिना-सैफचं रिअल लाइफ केमिस्ट्री, अभिनेत्यानं स्वतःच केला खुलासा

याशिवाय स्पॉटबॉय-ईनं दिलेल्या वृत्तानुसार या महिलेचं म्हणणं होतं की, गणेश आचार्य जेव्हापासून इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशनचा जनरल सेक्रेटरी झाला तेव्हापासून त्यानं तिला अधिकच त्रास द्यायला सुरुवात केली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर टीव्ही 9 मराठीशी बोलताना गणेश आचार्यनं सर्व आरोपांचं खंडण केलं आहे. या सर्व प्रकरणात सरोज खानचा हात असून माझ्याविरोधात असे आरोप करणाऱ्या लोकांना घाबरणाऱ्यातला मी नाही. मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेन. मी त्या महिलेला ओळखतही नाही आणि लोकांना माहित आहे की गणेश आचार्य व्यक्ती म्हणून कसा आहे किती लोकांचं करिअर मी मार्गी लावलं आहे. त्यामुळे अशा लोकांमुळे माझ्यावर काहीही फरक पडत नाही. मी माझं काम करत राहणार आहे. अशी प्रतिक्रिया गणेश आचार्यनं दिली आहे.

भाईजाननं सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा फोन हिसकावला, सलमानची दबंगगिरी कॅमेऱ्यात कैद

कोरिओग्राफर गणेश आचार्यनं काही दिवसांपूर्वीच एक नवी डान्सर असोसिएशन तयार केली आहे. ज्याच नाव ऑल इंडिया फिल्म, टेलिव्हिजन अँड इव्हेंट डान्सर्स असोसिएशन (AIFTEDA)आहे. याबाबत सीडीएनं चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी गणेश आचार्यनं AIFTEDA ची आवश्यकता का आहे याची कारणं युट्यूब व्हिडीओमधून सांगितली होती आणि तेव्हापासून तो चर्चेत होता.

सारा अली खान की आणखी कोण? हा VIDEO पाहिल्यावर तुम्हीही व्हाल हैराण

First published:

Tags: Bollywood, Ganesh Acharya