मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'घरात कोंडायचा आणि प्रायव्हेट पार्टवर...'; गंदी बात फेम अभिनेत्रीनं सांगितली 'त्या' दिवसांची हकिकत

'घरात कोंडायचा आणि प्रायव्हेट पार्टवर...'; गंदी बात फेम अभिनेत्रीनं सांगितली 'त्या' दिवसांची हकिकत

flora saini

flora saini

प्रेम, लग्न, जोडीदार या सगळ्यावरून तिचा विश्वास उडाला होता. सगळ्यावर मात करत ती पुन्हा प्रेमात पडलीये.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 जानेवारी : एकता कपूरच्या 'गंदी बात 2' मधून प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री फ्लोरा सैनी तुम्हाला आठवत असेल. वयाच्या 20व्या वर्षी तिनं करिअर घडवलं. करिअर पिकला असताना तिच्या आयुष्यात असं काही घडलं की तिनं केलेली मेहनत, तिचं नाव सगळंच मागे पडलं. एका प्रोड्युसरच्या ती प्रेमात पडली आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. ती अशा एब्यूसिव्ह रिलेशनमध्ये होती ज्यातून बाहेर पडणं तिच्यासाठी खूपच कठीण होतं.  प्रेम, लग्न, जोडीदार या सगळ्यावरून तिचा विश्वास उडाला होता. मात्र तरीही ती पुन्हा जिद्दीनं उठली आणि भूतकाळावर मात करत तिनं तिचा भविष्य आणि वर्तमानकाळ उज्वल बनवला आहे.

2018मध्ये अभिनेत्री फ्लोरा सैन हिनं तिच्याबरोबर झालेल्या अत्याचारावर पहिल्यांदा भाष्य केलं होतं. मिटू चळवळीत बॉलिवूडमधील अनेक प्रोड्युसर निशाण्यावर आले होते. तेव्हा फ्लोरानं देखील तिच्यावर झालेल्या अत्याचारावर खुलेपणानं सांगितलं होतं. त्यानंतर तिनं आता पुन्हा तिच्या या प्रवासाबद्दल एक व्हिडीओ शेअर करत भूतकाळ वर्तमान आणि भविष्यकाळावर भाष्य केलंय.

हेही वाचा - Anupama : 'रोज सेटवर मला त्यांचा भास होतो'; अनुपमाच्या 2 वर्षांनी रुपाली गांगूलीचा मोठा खुलासा

View this post on Instagram

A post shared by Flora Saini (@florasaini)

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री फ्लोरा सैनी प्रोड्यूर गौरांग दोषीबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. दोघांमध्ये प्रेम झालं आणि ते एकत्र राहू लागले. पण या नात्यात अभिनेत्रीनं खूप अत्याचारांचा सामना केला. तिनं प्रोड्युसरवर केलेल्या आरोपामध्ये सांगितलं होतं की, 'तो माझ्या प्रायव्हेट पार्टवर मुक्के मारायचा. मला इतकी मारहान करायची की मी गंभीर जखमी व्हायचे. त्याने माझे फोन काढून घेतला होता. मला घरात बंद खोलीत कोंडून ठेवलं होतं. माझी काम त्यानं बंद केली. 14 महिने मी हा अत्याचार सहन करत होते'. अभिनेत्री फ्लोरानं सगळं सहन केल्यानंतर मात्र एके दिवशी तिनं याविरोधात पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

फ्लोरा पुढे म्हणाली, 'एके संध्याकाळी तो मला मारहाण करत होता. तेव्हा मी त्याच्या तावडीतून कशीबशी सुटले आणि थेट आई वडिलांच्या घरी पोहोचले. त्यानंतर मी त्याच्याकडे गेलेच नाही'.  फ्लोरानं तिचाबरोबर घडलेला हा प्रकार एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केलाय. या सगळ्यातून आता ती बाहेर आली असून तिनं म्हटलंय, 'या सगळ्यातून बाहेर येणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. यासाठी मला अनेक महिने लागले. पण मी आता त्यातून बाहेर आले आहे.  मला पुन्हा प्रेम मिळालं आहे. मी खूप खुश आहे. माझ्या भूतकाळ कसाही असला तरी माझा वर्तमान  आणि भविष्यकाळ खूप उत्तम आहे'.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News