'गेम आॅफ थ्रोन्स'चा 7वा सीझन 16 जुलैपासून सुरू

'गेम आॅफ थ्रोन्स'चा 7वा सीझन 16 जुलैपासून सुरू

विंटर इस कमिंग, म्हणत 'गेम ऑफ थ्रोन्स' या जगप्रिसिद्ध सुपरहिट अमेरिकन सीरिझचा 7वा सीझन येत्या जुलै महिन्यापासून सुरू होत आहे.

  • Share this:

चित्राली चोगले, 24 एप्रिल : विंटर इस कमिंग, म्हणत 'गेम ऑफ थ्रोन्स' या जगप्रिसिद्ध सुपरहिट अमेरिकन सीरिझचा 7वा सीझन येत्या जुलै महिन्यापासून सुरू होत आहे.पण जुलैची प्रतीक्षा काही या 'गॉट'च्या फॅन्ससाठी तितकी सोप्पी नाहीये. सीझन 6चे हाय पॉईन्ट्स आणि ट्विस्ट असे काही रंगले की 7व्या सीझनची उत्सुकता अगदी सीझन 6च्या शेवटच्या एपिसोडनंतरच शिगेला पोहचली.

रेड वुमन ते विन्ड्स ऑफ विंटरसोबत 6व्या सीझनचे उतार चढाव अतिशय रंजक स्वरूपात दर्शवले गेले. मग ते जॉन स्नोचं पुन्हा जिवंत होणं असो , होल्ड द डोर म्हणजेच होडोरच्या मरणाचा सीन असो , आर्याचा पाय सीन असो किंवा अगदी जॉनची आई कोण आहे याचा खुलासा असो, हे आणि अशा अनेक हाय पॉईन्टसनी तर सगळ्यांना त्यांच्या खुर्चीत खिळवून ठेवलं. रस्ता,कॉलेजचं कॅन्टिन,ऑफिसची लॉबी, मित्रांचा कट्टा, ट्रेनचा प्रवास सगळीकडे 'गॉट'च्याच हाय पॉईन्टसच्या चर्चा रंगल्या.

तर 6व्या सीझनच्या हाय पॉईन्ट्सने प्रेक्षकांची अवस्था चातकासारखी केली आहे. त्यातच एरवी सीझन प्रीमिअर एप्रिल किंवा फार फार तर मे महिन्याच्या मध्याला होतात,  तिथे हा सीझन अपवाद ठरत याच्या प्रीमिअरला मात्र जुलै उजाडणार आहे. म्हणजे एकंदरीत या प्रतीक्षेचा काळ वाढला आहे, तर 6व्या सीझनच्या शेवटी डनेरीस टार्गेरिअन वेस्टरोससाठी तर निघालीये.  इथून पुढे काय होणार, त्या आर्यन थ्रोनवर नेमका कोण बसणार हे आणि असे अनेक प्रश्न सध्या सगळ्यांना पडले असले तरी जुलै 16ची वाट सगळ्यांना पहावी लागणारच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 04:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading