मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Gadad Andhar: मराठीतील पहिली 'हॉरर अंगाई' रिलीज; जुईली जोगळेकरचा आवाज आणतोय अंगावर शहारा

Gadad Andhar: मराठीतील पहिली 'हॉरर अंगाई' रिलीज; जुईली जोगळेकरचा आवाज आणतोय अंगावर शहारा

जुईली जोगळेकर

जुईली जोगळेकर

मराठी सिनेसृष्टीमध्ये सतत नवनवीन प्रयोग होत असतात. गेल्या काही दिवसांत अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अशातच आता आणखी एक नवा प्रयोग मराठी सिनेमामध्ये होत आहे. पाण्याखालचं जग दाखवणारा 'गडद अंधार' हा थरारक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 25 जानेवारी-   मराठी सिनेसृष्टीमध्ये सतत नवनवीन प्रयोग होत असतात. गेल्या काही दिवसांत अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अशातच आता आणखी एक नवा प्रयोग मराठी सिनेमामध्ये होत आहे. पाण्याखालचं जग दाखवणारा 'गडद अंधार' हा थरारक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्यांदाच मराठीत असा आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या थरारक टीझर आणि ट्रेलरने सर्वांचीच धडकी भरवली होती. त्यांनतर आता या चित्रपटाच्या माध्यमातून आणखी एक नवा प्रयोग केला जात आहे. आणि तो प्रयोग म्हणजे पहिल्यांदाच मराठीत 'हॉरर अंगाई'सादर करण्यात येत आहे. नुकतंच ही अंगाई रिलीज करण्यात आली आहे.

'गडद अंधार' या सिनेमाच्या माध्यमातून पाण्याखालचं जग उलगडून दाखवलं जाणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच प्रचंड चर्चेत आला होता. या सिनेमातील श्वास रोखणारी दृश्ये आणि मनाला भिडणारे डायलॉग्स प्रेक्षकांनां भुरळ पाडत आहेत. या चित्रपटामध्ये विविध रहस्ये उलगडलेली पाहायला मिळणार आहेत. दरम्यान चित्रपटाचं एक नवं कोरं गाणं रिलीज झालं आहे. खरं तर ही एक अंगाई आहे. आणि विशेष म्हणजे ही होणार अंगाई आहे. या अंगाईच्या ओळी अंगावर शहारा आणणाऱ्या आहेत.

(हे वाचा: Ketaki Mategaonkar:'शिरोडकर पुन्हा येतेय?', 'शाळा 2' बाबत केतकी माटेगावकरने दिली मोठी अपडेट)

मराठीतील लोकप्रिय गायिका जुईली जोगळेकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. जुईलीने पोस्ट शेअर करत लिहलंय, 'सादर करत आहोत, मराठी सिनेमाच्या इतिहासातली पहिली Horror ‘अंगाई’.. !. ही अंगाई जुईली जोगळेकरने गायली आहे. जुईलीचा आवाज अंगावर शहारा आणत आहे.

याआधी 'गडद अंधार' या चित्रपटातील 'दरिया' हे गाणं रिलीज झालं होतं. या गाण्यात पाण्याखालच्या विश्वाची झलक दाखवण्यात आली होती. सोबतच पाण्याखाली दडलेल्या रहस्याचीसुद्धा काही दृश्य दाखवण्यात आली आहेत.गायक रोहित राऊत याच्या आवाजातील हे गाणं प्रेक्षकांना चांगलंच पसंत पडलं होतं. त्यांनतर आता ही रोहितची पत्नी आणि आणि गायिका जुईली जोगळेकरच्या आवाजातील ही हॉरर अंगाई प्रेक्षकांना कितपत पसंत पडते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

'गडद अंधार' हा चित्रपट प्रज्ञेश कदम यांनी दिग्दर्शित केला आहे.बिग बॉस मराठी ३ चा उपविजेता ठरलेला लोकप्रिय स्पर्धक जय दुधाणे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. जयच्या जोडीला अभिनेत्री नेहा महाजन असणार आहे. सोबतच चित्रपटात आकाश कुंभार, शुभांगी तांबळे, आरती शिंदे, चेतन मुळे यांच्या महत्वाच्या भूमिका असणार आहेत.

First published:

Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment