VIDEO : कपिल शर्माचं पितळ उघड! सिनेमाच्या प्रमोशनसाठी पैसे घेताना रंगेहात पकडलं

VIDEO : कपिल शर्माचं पितळ उघड! सिनेमाच्या प्रमोशनसाठी पैसे घेताना रंगेहात पकडलं

कपिलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात तो सिनेमाच्या प्रमोशनसाठी पैसे घेताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर : कॉमेडी किंग कपिल शर्मा त्याच्या कॉमेडीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा ‘कपिल शर्मा शो’ सध्या टीआरपी लिस्टमध्ये आहे. त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशात कपिलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात तो सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेता अजय देवगणकडून पैसे घेताना दिसत आहे. कपिलला असं करताना पाहून त्याचे चाहते खूपच हैराण झाले आहेत.

कपिल शर्मानं नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो अजय देवगणचा सिनेमा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’चं प्रमोशन करताना दिसत आहे. त्यानंतर अजय देवगण तिथे येतो आणि कॅमेरामनला शूट बंद करायला सांगतो आणि कपिलला काही पैसे देताना दिसतो.

अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालची TikTok वर धमाकेदार एंट्री, पाहा VIDEO

अजय देवगण कपिलला 1 हजार रुपये देतो. पण या व्हिडीओमध्ये कपिल त्याच्याकडे 1200 रुपयांची डील झाल्याची आठवण करुन देतो. पण अजय त्याच्याकडे दुर्लक्ष करुन निघून जातो आणि कपिल सुद्धा गुपचूप ते पैसे त्याच्या पॉकेटमध्ये ठेवतो. कपिल आणि अजयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.अर्थात हा व्हिडीओ एका मस्करीचा भाग आहे.

तुला का जिंकायचं आहे? या प्रश्नाचं उत्तर देऊन टोनी अ‍ॅन सिंग झाली विश्वसुंदरी

‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिल प्रत्येक आठवड्यात कॉमेडीचा नवा तडका घेऊन येतो. या आठवड्यात ‘दबंग 3’ची पूर्ण टीम प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये पोहोचली होती. त्यानंतर कपिल शर्माचा हा व्हायरल व्हिडीओवरुन अंदाज लावला जाऊ शकतो की, पुढच्या आठवड्यात देवगण आणि काजोल त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये दिसणार आहे.

‘तान्हीजी : द अनसंग वॉरियर’ पुढच्या वर्षी 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अजय देवगण छत्रपति शिवाजी महाराजांचे सुभेदार तानाजी मालुसरे यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. अजय व्यतिरिक्त या सिनेमात सैफ अली खान, काजोल, पंकज त्रिपाठी, शरद केळकर, देवदत्त नागे इत्यादींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच या दिवशी दीपिका पदुकोणचा 'छपाक' सुद्धा रिलीज होत असल्यानं या दोन्ही सिनेमांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

प्रिती झिंटाने नाकारली होती 600 कोटी रुपयांची संपत्ती!

Published by: Megha Jethe
First published: December 15, 2019, 2:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading