S M L

शशी कपूर यांना आज अखेरचा निरोप

त्यांचं पार्थिव सांताक्रूझ स्मशानभूमीत आणलं गेलंय. शशी कपूर यांनी वयाच्या ७९व्या वर्षी काल अखेरचा श्वास घेतला.

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 5, 2017 12:46 PM IST

शशी कपूर यांना आज अखेरचा निरोप

05 डिसेंबर,मुंबई :  ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली आहे. काल प्रदीर्घ आजारानं निधन झालं आहे.  त्यांचं पार्थिव सांताक्रूझ स्मशानभूमीत आणलं गेलंय.  शशी कपूर यांनी वयाच्या ७९व्या वर्षी काल अखेरचा श्वास घेतला.

हिंदी चित्रपटसृष्टीतले अनेक जण त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी जात आहेत. करिष्मा कपूर, बोनी कपूर, संजय कपूर, काजोल यांनी शशी कपूर यांना घरी जाऊन आदरांजली वाहिली. मेरे पास माँ है, हा डायलॉग अजरामर करणारे अभिनेते शशी कपूर यांनी कोट्यवधी चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. एवढंच नाही, तर मुख्य प्रवाहातल्या चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच, समांतर चित्रपटांमध्येही त्यांची कामगिरी तितकीच मोलाची होती. अनेक हटके सिनेमांची निर्मिती त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून केली होती.  त्याकाळी हॉलिवूडमध्ये काय चाललंय, याचाही त्यांचा अभ्यास असायचा. वाचनाची त्यांना खूप आवड होती.

कपूर घराण्यातला एक संवेदनशील आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 5, 2017 12:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close