मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'फू बाई फू'च्या जागी 2 नव्या मालिका; एक ऐतिहासिक तर दुसरी फुल्ल टू मॉर्डन

'फू बाई फू'च्या जागी 2 नव्या मालिका; एक ऐतिहासिक तर दुसरी फुल्ल टू मॉर्डन

 'फू बाई फू'च्या जागी 2 नव्या मालिका

'फू बाई फू'च्या जागी 2 नव्या मालिका

फू बाई फूच्या नव्या सीझननं महिनाभरात आपला गाशा गुंडाळला. फू बाई फूच्या जागी दोन अतिशय भिन्न विषयांच्या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 09 डिसेंबर : टेलिव्हिजनवर सध्या अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांचा सिलसिला मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मागच्या काही महिन्यात झी मराठी वाहिनीवर अनेक नव्या धाटणीच्या आणि विषयाच्या मालिका सुरू झाल्यात. मात्र टीआरपीच्या शर्यतीत वाहिनी मागेच असल्याचं दिसून आलं आहे. अशातच फू बाई फू चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं.  मात्र महिन्याभरात फू बाई फूनं आपला गाशा गुंडाळल्याचं चित्र समोर आलं आहे.  फू बाई फू बुधवार ते शनिवारी रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र 17 डिसेंबरपासून फू बाई फू प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. फू बाई फूच्या जागी दोन नव्या कोऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

फू बाई फूच्या जागी दोन नव्या विषयाच्या आणि विरुद्ध धाटणीच्या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. एक ऐतिहासिक तर दुसरी पूर्णपणे मॉर्डन आणि नव्या पिढीची मालिका सुरू होणार आहे. एक शो बंद होताच दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 21 डिसेंबरपासून लोकमान्य ही मालिका रात्री 9.30वाजता सुरू होणार आहे. तर अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई ही मालिका रात्री 10 वाजता पाहायला मिळणार आहे. टेलिव्हिजनवर 9.30 आणि 10 च्या स्लॉटला आजवर कधीही मालिका दिसल्या नाहीत. यावेळी नेहमीच एखादा रिअलिटी शोच सुरू असतो. पण झी मराठी या नवा प्रयोग करतंय असं म्हणायला हवं.

हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte : देशमुखांच्या घरात ज्युनिअर अनिरुद्धचा जन्म; अनघाच्या डोहाळे जेवणात समोर येणार अभिषेकचं खरं रुप

स्वराज्याचा अर्थ समजविणाऱ्या आणि स्वातंत्र्याचा सूर्य दाखविणाऱ्या महापुरुषाची महागाथा लोकमान्य टिळकांची कथा यात पाहायला मिळणार आहे. लोकमान्य या मालिकेच्या निमित्तानं अनेक वर्षांनी झी मराठीवर ऐतिहासिक मालिका पाहायला मिळत आहे. मालिकेत अभिनेता क्षितिश दाते हा लोकमान्य टिळकांच्या प्रमुख भूमिकेत आहे. तर अभिनेत्री स्पृहा जोशी ही लोकमान्य टिळकांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

तर दुसरीकडे रात्री 10 वाजता अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूसाई ही मालिका सुरू होत आहे. लोकमान्य आणि अगं अगं सूनबाई या दोन्ही भिन्न मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. शेर सासूबाईंच्या नशिबी आलेल्या सव्वाशेर सूनबाईंची भन्नाट कथा मालिकेत पाहायला मिळणार आहे. यानिमित्तानं सासू सूनेची हलकी फुलकी कॉमेडी देखील प्रेक्षकांच्या पाहायला मिळेल. मालिकेत अभिनेत्री सुकन्या मोने सासूच्या भूमिकेत आहे तर अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सूनेच्या भूमिकेत आहेत.

फू बाई फूच्या जागी सुरू होत असलेल्या या दोन्ही मालिका आता प्रेक्षकांच्या मनावर काय जादू करणार हे येत्या 21 डिसेंबरनंतरच पाहायला मिळणार आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial