मायकल जॅक्सन ते जस्टिन बिबर, पाॅप स्टार्सचं भारतात उदंड स्वागत

1996मध्ये मायकल जॅक्सन मुंबईत आला होता ते फक्त आणि फक्त शिवसेनेमुळे. शिव उद्योग सेनेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Sonali Deshpande | Updated On: May 11, 2017 12:56 PM IST

मायकल जॅक्सन ते जस्टिन बिबर, पाॅप स्टार्सचं भारतात उदंड स्वागत

11 मे : तो आला, त्यानं पाहिलं, बऱ्याच चर्चा झाल्या, तो गेला तरीही चर्चा होतच राहिल्या. 2017ला हे घडतंय पाॅप सिंगर जस्टिन बिबरबद्दल. पण 1996लाही हे घडलं होतं. आणि तिथे होता पाॅप स्टार मायकल जॅक्सन.

1996मध्ये मायकल जॅक्सन मुंबईत आला होता ते फक्त आणि फक्त शिवसेनेमुळे. शिव उद्योग सेनेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. सहार विमानतळावर जॅक्सन उतरला तेव्हा त्याच्या स्वागताला राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि सोनाली बेंद्रे उपस्थित होते. आणि सोनालीनं नऊवारी साडी नेसून  खास मराठमोळ्या पद्धतीनं मायकल जॅक्सनचं औक्षण करून स्वागत केलं होतं आणि तो त्यामुळे भारावून गेला होता.

मायकलच्या काॅन्सर्टआधी त्याची मातोश्रीवरची भेट, त्याचं हाॅटेल ओबेराॅयमध्ये उतरणं, फॅन्सना मोकळेपणानं भेटणं सगळंच चर्चेत राहिलं.  जॅक्सनला मातोश्रीवर भारतीय वाद्यांची भेट मिळाली होती.

अंधेरी स्पोर्ट्स काॅम्प्लेक्सवर ही काॅन्सर्ट झाली.  ही काॅन्सर्ट फॅन्सनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. बाॅलिवूडचे सगळे दिग्गज हजर होते. शिव उद्योग सेनेच्या मदतीसाठी हा शो केला गेला.

1996मध्ये आजच्या मानानं सोशल मीडिया प्रभावी नव्हता. त्या काळात व्हाॅटसअप नव्हतं. तरीही मायकल जॅक्सनची काॅन्सर्ट शिवसेनेच्या पुढाकारानं आयोजित केल्यामुळे ती प्रत्येकाच्या उत्सुकतेचा विषय ठरली.

जस्टिन बिबरची हवा होणं काही अवघड नव्हतं. आताची चॅनेल्स, सोशल मीडिया यामुळे जस्टिन तरुणाईपर्यंत पोचला. 50 हजारांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी गर्दीही केली. अर्थात, जस्टिनच्या आगमनामागे कुठलाही राजकीय पक्ष नव्हता. त्यामुळे हा उत्साह तरुणांपर्यंतच राहिला. त्यात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेही होतेच. त्यांनी जस्टिनची भेट घेतली.  आणि बाॅलिवूडकरांचा उत्साह 1996च्या वेळेप्रमाणे आताही होताच.

मायकल जॅक्सननंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पाॅप स्टार भारतात आला, तो म्हणजे जस्टिनच.  काळ बदलतो. माणसं बदलतात. पण कलेविषयीचं प्रेम, आदर, उत्साह तसाच राहतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2017 12:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close