Friendship Day 2019: आपल्या मित्रांना ही 10 गाणी नक्की ऐकवा

Friendship Day 2019: आपल्या मित्रांना ही 10 गाणी नक्की ऐकवा

Friendship Day 2019: जसा फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना असतो त्याचप्रमाणे ऑगस्ट हा मैत्रीचा महिना असतो.

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट- जसा फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना असतो त्याचप्रमाणे ऑगस्ट हा मैत्रीचा महिना असतो. यंदा 4 ऑगस्टला जगभरात Friendship Day साजरा करण्यात येणार आहे. आतापर्यंत उद्या नक्की काय काय करायचं याचं प्लॅनिंग तर अनेकांचं झालं असेल. मित्र- मैत्रिणींसोबत कुठे पार्टी करायची... कोणाला काय गिफ्ट द्यायचं... या सगळ्याचीच तयारी झाली असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमची फ्रेण्डशीप डेची पार्टी या बॉलिवूड गाण्यांशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे उद्याच्या खास दिवसांसाठी आजच ही गाणी ट्यून इन करा किंवा डाउनलोड करून ठेवा. उद्या सकाळी तुमच्या जवळच्या मित्र- मैत्रिणींना ही गाणी पाठवा.

ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे

कोणतीही मैत्री या गाण्याशिवाय अपूर्ण आहे. 'शोले' सिनेमातील हे गाणं कोणाला माहीत नसेल. जेव्हाही मैत्रीच्या गाण्याचा विषय निघेल तेव्हा या गाण्याचा उल्लेख हमखास होईल. किशोर कुमार आणि मन्ना डे यांनी हे गाणं गायलं होतं. स्वतः किशोर आणि मन्ना हे खऱ्या आयुष्यात फार जवळचे मित्र होते.

यारों दोस्ती बड़ी ही हसीन है

जुन्या गाण्यांमध्ये 'शोले'मधलं 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे' हे गाणं हिट झालं, तेवढंच 'यारों दोस्ती बड़ी ही हसीन है' हे गाणंही ऐकलं गेलं. शाळेचा शेवटचा दिवस असो किंवा कॉलेजचा फ्रेण्डशिप डेला हे गाणं हमखास ऐकलं जातं.

तेरे जैसा यार कहां...कहां ऐसा याराना

'याराना' सिनेमातील हे गाणं अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांच्यावर चित्रीत करण्यात आलं. खऱ्या आयुष्यातही हे दोघं घनिष्ठ मित्र होते.

बने चाहे दुश्मन जमाना हमारा...

'दोस्ताना' सिनेमातील हे गाणं किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांनी गायलं होतं. मैत्रीवर तयार करण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी हे एक गाणं आहे.

ना छूटे यारियां

'कॉकटेल' सिनेमातील हे गाणं 2012 मध्ये आलं होतं. या सिनेमाचा अल्बम फार हिट झाला होता. ना छूटे यारियां या गाण्याशिवाय या सिनेमातीलच दारू देसी हे गाणंही लोकांना आवडलं होतं.

यारी है इमान मेरा

'जंजीर' सिनेमातील या गाण्याचे बोल फार सुंदर आहे.

'यारी है इमान मेरी यार मेरी ज़िंदगी, प्यार हो बंदों से ये सबसे बड़ी है बंदगी'. मन्ना डे यांनी हे गाणं गायलं होतं.

दिल चाहता है

'दिल चाहता है' या सिनेमाचं टायटल ट्रॅकही फार हिट झालं होतं. या सिनेमात तीन मित्रांची गोष्ट सांगण्यात आली होती. गाण्याचे बोल काही अशा प्रकारे आहेत.

'दिल चाहता है ,कभी ना बीते चमकीले दिन

दिल चाहता है,हम ना रहे कभी यारों के बिन'

तू ही तो मेरी दोस्त है

'युवराज' सिनेमातील हे गाणं तुम्ही तुमच्या मैत्रिणीला पाठवू शकता. सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका या सिनेमात होत्या.

सूरज डुबा है यारो

'रॉय' सिनेमातील हे गाणं पूर्ण पार्टी साँग आहे. फ्रेण्डशिप डेच्या दिवशी पार्टी करताना हे गाणं नक्की लावा.

अतरंगी यारी

'वझीर' सिनेमातील हे गाणं श्रवणीय आहे. मैत्रीवर आधारित हे गाणं फरहान अख्तर आणि अमिताभ बच्चन यांनी गायलं आहे.

मनसेसमोर अभिनेता अक्षय कुमारची माघार, Mission Mangal चं यू-टर्न

हॉटेलमधून शॅम्पूच्या बाटल्या चोरायची दीपिका, बेस्ट फ्रेंडने सांगितलं गुपित

करण जोहरच्या 'ड्रग पार्टी'विरोधात आमदाराने लिहिलं Open Letter

बॉलिवूडच्या या 5 कपल्सनी सर्वांसमोर दिली होती नात्याची कबुली

विद्या बालनच्या आयुष्यात नवी 'कहाणी' पाहा हा VIDEO

Published by: Madhura Nerurkar
First published: August 3, 2019, 7:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading