मुंबई 28 मे: फ्रेंड्स ही 90च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. हलके फुलके विनोद आणि सहा मित्र-मैत्रीणींमध्ये सुरु त्यांच्या अनोख्या दुनियादारीनं अक्षरश: धुमाकूळ घातला होता. याच सुपरहिट मालिकेचं रियुनिअन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. फ्रेंड्स: द रियुनियन (Friends: The Reunion) ही विशेष मालिका नुकतीच झी ५ वर प्रदर्शित झाली. अन् आश्चर्याची बाब म्हणजे त्याला देखील भारतीय प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. अगदी पहिल्या नऊ तासांत तब्बल 10 लाख लोकांनी पेड सबस्क्रिप्शन घेऊन ही मालिका पाहिली.
झी डिजिटल बिझिनेस अँड प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष अमित गोयंका यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती चाहत्यांना दिली. “फ्रेंड्स द रियुनियनला झी 5 वर खूप व्हूज मिळाले आहेत, याचा आम्हाला खूप आनंद झाला. यात 10 लाखाहून अधिक लोकांनी हा सिझन पाहिला आहेत आणि अद्याप ही मोजणी चालूच आहे. या शोच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी लाखो स्क्रीनवर हा शो प्ले केल्याचा आम्हाला अभिमान आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
किसिंग सीनमुळं आली होती चर्चेत; शिल्पा शिरोडकर का झाली बॉलिवूडमधून गायब?
We remain committed to delivering compelling content that caters to the consumers’ unique tastes and enhances the value for our partners. We will continue to augment our offerings with a bespoke catalogue of premium and original content for global audiences. #FriendsReunion
— Amit Goenka (@AmitGoenka_) May 27, 2021
‘आधी पुशअप्स मग सेल्फी’; फोटो मागणाऱ्या महिलेकडून मिलिंदनं करुन घेतला व्यायाम
The one we've all been waiting for is here. Friends: The Reunion streaming now on HBO Max. pic.twitter.com/F8rnsP2ACa
— FRIENDS (@FriendsTV) May 27, 2021
‘फ्रेंड्स: द रियुनियन’चा संपूर्ण भाग 104 मिनिटांचा आहे. यामध्ये जेनिफर एनिस्टन, कोर्टनी कॉक्स, लिसा कुड्रो, मॅट लेब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेव्हिड श्वाइमर मुख्य भूमिकेत झळकले आहेत. शिवाय जस्टीन बीबर, बीटीएस, जेम्स कॉर्डन, लेडी गागा, टॉम सेलेलक, जेम्स मायकेल टायलर, मॅगी व्हिलर, रीझ विदरस्पून आणि मलाला यूसुफजई पाहुण्यांच्या भूमिकेत दिसले आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे फ्रेंड्स: द रियुनियनच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी मालिकेचे जुने लेखक, बॅक स्टेज आर्टिस्ट, आणि त्यावेळचे इतर सर्व कर्मचारी यांना एकत्र आणलं. जवळपास 18 वर्षानंतर या सर्वांनी एकत्र काम केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, TV serials