Home /News /entertainment /

हॉलिवूडला धक्का, प्रसिद्ध अभिनेता Gaspard Ulliel चा अपघातात मृत्यू

हॉलिवूडला धक्का, प्रसिद्ध अभिनेता Gaspard Ulliel चा अपघातात मृत्यू

Gaspard Ulliel

Gaspard Ulliel

मार्वल्सच्या सीरिजच्या फॅन्ससाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मार्वल्सच्या आगामी सीरिजचा फ्रेंच अभिनेता गॅस्पर्ड उलियेलचा (Gaspard Ulliel ) स्कीइंग करताना अपघातात मृत्यू झाला.

    नवी दिल्ली, 20 जानेवारी: मार्वल्सच्या सीरिजच्या फॅन्ससाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मार्वल्सच्या आगामी सीरिजचा फ्रेंच अभिनेता गॅस्पर्ड उलियेलचा (Gaspard Ulliel ) स्कीइंग करताना अपघातात मृत्यू झाला. त्याचे वय केवळ 37 होते. गॅस्पर्ड हा मार्वल्सच्या आगामी सीरिज ‘मून नाइट’ मध्ये झळकणार होता. मात्र त्यापूर्वीच त्याचा अपघातात मृत्यू झाला. त्याच्या निधनाने हॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी दुपारी घडली घटना फ्रेंच मीडियाच्या वृत्तानुसार, हा अपघात मंगळवारी दुपारी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिणपूर्व फ्रान्समधील मॉन्टवालेझन शहरात स्कीइंग करण्यासाठी गेला होता. त्यावेळी ही घटना घडली. गॅस्पर्ड स्कीइंग करत असतानाच त्याची दुसऱ्या स्कीयरशी टक्कर झाली. या धडकेमुळे ते दोघेही जमिनीवर कोसळले. यानंतर तातडीने बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान गॅस्पर्ड हा काहीही हालचाल करत नव्हता. तो पूर्णपणे बेशुद्ध झाला होता. गॅस्पर्डच्या निधनावर अनेक सेलिब्रिटी दुःख व्यक्त करत आहेत. फ्रेंच अभिनेता जीन दुजार्डिनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून गॅस्पर्डचा फोटो पोस्ट करत झालेल्या घटनेचा उल्लेख केला आहे. फ्रान्सचे पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनीही अभिनेता गॅस्पर्ड उलियेलच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. 'गॅस्पर्ड सिनेमासोबत मोठा झाला आणि सिनेमा त्याच्यासोबत मोठा झाला. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. फ्रान्समधील एक महान अभिनेता आपण गमावला आहे. अशा आशयाची पोस्ट करत त्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. गॅस्पर्डने 'हॅनिबल रायझिंग'मध्ये लेक्टरची भूमिका केली होती, ज्यामुळे त्याला लोकप्रियता मिळाली. या अभिनेत्याला 2017 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फ्रेंच सीझर पुरस्कारही मिळाला. 'इट्स ओन्ली द एंड ऑफ द वर्ल्ड'साठी त्याला पुरस्कार सन्मानित केला होता.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Entertainment

    पुढील बातम्या