Home /News /entertainment /

शिल्पा शेट्टीच्या नावाने कोट्यवधींची फसवणूक, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

शिल्पा शेट्टीच्या नावाने कोट्यवधींची फसवणूक, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) च्या नावाने फसवणूक झाल्याची घटना ताजी असताना आता उत्तर प्रदेशमधून अशीच घटना समोर येत आहे.

    मुंबई, 08 जुलै : अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) च्या नावाने फसवणूक झाल्याची घटना ताजी असताना आता उत्तर प्रदेशमधून अशीच घटना समोर येत आहे. राजधानी लखनऊमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) च्या नावाने कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. लखनऊ पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. शिल्पा शेट्टीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या बदमाशांविरोधात हजरतगंज पोलीस ठाण्यात खटला दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी हजरतगंजमधील एओसिस स्पा अँड वेलनेस कंपनीच्या मालकासह त्याच्या कर्मचाऱ्यांवर खटला दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार  एओसिस स्पा अँड वेलनेस कंपनीचा एमडी किरण बाबा याने मिदासदीप एंटरप्राइजच्या संचालकाकडून फ्रेंचायजी शुल्काच्या नावाखाली काही पैशांची गुंतवणूक करवून घेतली होती. त्याच्याकडून गुंतवणूकदाराला असे सांगण्यात आले होते की, त्याची ब्रँड अम्बॅसिडर प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आहे. (हे वाचा-फेसबुकवर अश्लील कमेंट्स करणाऱ्याविरोधात अभिनेत्रीने दाखल केली FIR) असा आरोप केला जात आहे की, किरण बाबाने शिल्पा शेट्टीचे अनेक फोटो आणि बॅनर्सचा प्रचार देखील केला होता. फसवणूक झालेल्याने अशी देखील माहिती दिली की, त्याला असे सांगण्यात आलं होतं की स्वत: शिल्पा शेट्टी देखील वेळोवेळी त्याठिकाणी येऊन निर्देशन करते. त्यामुळे त्याने किरण बाबाबरोबर पार्टनरशीप केली, मात्र नेहमी यामध्ये त्याला नुकसान सहन करावे लागले. सतत नुकसान होत असल्यामुळे पीडित व्यक्तीने चौकशी करण्यास सुरूवात केली, त्यावेळी त्याला या फसवणुकीची खबर लागली. पीडित इसमाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी आणि त्याच्या कर्मचाऱ्यांविरोधात भा.द.वी. कलम 408, 420 आणि 506 अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. (हे वाचा-सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्रोलिंगमुळे करण जोहर पूर्णपणे खचला, मित्राचा खुलासा) एसीपी हजरतगंज अभय कुमार मिश्रा यांनी अशी माहिती दिली आहे की, एओसिस स्पा अँड वेलनेस कंपनीचा एमडी आणि डायरेक्टरसह अन्य काही लोकांविरोधात विभूतीखंड पोलीस ठाण्यातही ही खटला दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bollywood, Shilpa shetty

    पुढील बातम्या