चार बेडरुम, 16 कोटी किंमत!, असा आहे दीपिकाचा 'बो मोंड'मधला फ्लॅट

चार बेडरुम, 16 कोटी किंमत!, असा आहे दीपिकाचा 'बो मोंड'मधला फ्लॅट

  • Share this:

मुंबई, 13 जून : मुंबईतील प्रभादेवी इथल्या  बो मोंड टॉवरला आग लागली. या टाॅवरमध्ये  अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा याच इमारतीत 26व्या मजल्यावर फ्लॅट आहे.

जेव्हा आग लागली तेव्हा दीपिका शुटिंग निमित्तानं बाहेर होती. दीपिकानं 2010 साली 16 कोटी रूपयांना हा फ्लॅट विकत घेतला होता. 'बी' विंगमध्ये 26 व्या मजल्यावर तिचा हा भव्य फ्लॅट आहे.

दीपिकाचा हा फ्लॅट तब्बल 4 बेडरूमचा आहे. विनीता चैतन्य हिनं तिच्या घराचं इंटिरियर डेकोरेशन केलं होतं. या इमारतीला आग लागली तेव्हा दीपिकाही शुटिंगसाठी बाहेर होती.  दीपिकाने टि्वट करून आपण सेफ असल्याचं टि्वट करून सांगितलं. तसंच अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळेल अशी आशा व्यक्त केली.

कसं आहे दीपिकाचं घर?

1.दीपिका पदूकोण आणि प्रकाश पदूकोण यांनी विकत घेतलाय फ्लॅट

2.दीपिकाच्या फ्लॅटची किंमत 16 कोटी रु.

3.'बी' विंगमध्ये 26 व्या मजल्यावर राहते दीपिका पडूकोण

4.2010 पासून दीपिका राहते ब्यू माँडे इथे

5.सिद्धीविनायक मंदिरापासून जवळ आहे 'ब्यू माँडे'

6. दीपिकाचा फ्लॅट आहे 4 बेडरूमचा

दरम्यान, बो मोंड टॉवरला लागलेली आग आता आटोक्यात आलीये. या आगीचं कारण  मात्र अद्याप अस्पष्ट आहे. इमारतीच्या 32 आणि 33व्या मजल्यावर ही आग लागली होती.

First published: June 13, 2018, 5:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading