शिवसेनेसाठी इम्रान हाश्मीनं घेतली माघार, 'चीट इंडिया'चा घेतला मोठा निर्णय

शिवसेनेसाठी इम्रान हाश्मीनं घेतली माघार, 'चीट इंडिया'चा घेतला मोठा निर्णय

ठाकरे सिनेमासाठी इम्रान हाश्मीच्या 'चीट इंडिया'चं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शिवसेनेने चीट इंडियाच्या निर्मात्यांना तशी विनंती केली होती जी त्यांनी मान्य केलीय.

  • Share this:

मुंबई, 04 जानेवारी : येत्या 25 जानेवारीला बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमा रिलीज होतोय. त्या दिवशी अजून कुठला सिनेमा रिलीज होऊ नये, अशी शिवसेनेची इच्छा आहे.25 जानेवारीला चिट इंडिया आणि मणिकर्णिका रिलीज होणार, असं ठरलेलं.

ठाकरे सिनेमासाठी इम्रान हाश्मीच्या 'चीट इंडिया'चं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शिवसेनेने चीट इंडियाच्या निर्मात्यांना तशी विनंती केली होती जी त्यांनी मान्य केलीय. आज संध्याकाळी मुंबईतल्या जे.डब्लू. मॅरिएट हाॅटेलमध्ये ठाकरे आणि चिट इंडियाचे निर्माते, दिग्दर्शक एकत्र पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची अधिकृत घोषणा करतील.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील ठाकरे हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली आहे. याच दिवशी इम्रान हाश्मीचा चीट इंडिया आणि कंगनाचा मणिकर्णिका प्रदर्शित होणार असल्याने अडचण निर्माण झाली होती. मात्र चिट इंडियाच्या निर्मात्यांनी चित्रपट एक आठवडा अगोदर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाकरे सिनेमातून शिवसेना मनसेची अनोखी युती पाहायला मिळतेय. संजय राऊत यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून त्यासाठी त्यांना चार वर्षे लागली. अभिजीत पानसे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

चीट इंडियाप्रमाणे मणिकर्णिका ह्या सिनेमाच्या निर्मात्यांना सिनेमा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती जी त्यांनी फेटाळून लावल्याने आता ठाकरे आणि मणिकर्णिका हे दोन्ही सिनेमे 25 जानेवारीला रिलीज होतील

हिंदीमुळे मराठी चित्रपटांना कमी शो मिळतात यामुळे वादही होत आहेत. आज (४ जानेवारी) भाई व्यक्ती की वल्ली हा पु.ल. देशपांडेंवरचा सिनेमा रिलीज होतोय. मात्र रणवीर सिंगच्या सिंबा सिनेमामुळे भाई सिनेमाला खेळ मिळावेत म्हणून झगडावे लागत असल्याचं चित्र दिसतंय.

First published: January 4, 2019, 11:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading