जनजागृतीसाठी 'पॅडमॅन' साताऱ्यात; मराठीतून महिलांशी साधला मुक्त संवाद

जनजागृतीसाठी 'पॅडमॅन' साताऱ्यात; मराठीतून महिलांशी साधला मुक्त संवाद

पोलीसदलाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या युथ पार्लमेंटला खुद्द सिनेअभिनेता अक्षयकुमारनं हजेरी लावली.

  • Share this:

24 फेब्रुवारी : सातारा-कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रच्या वतीनं साताऱ्यात युथ पार्लमेंटचं आयोजन करण्यात आलं. पोलीसदलाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या युथ पार्लमेंटला खुद्द सिनेअभिनेता अक्षयकुमारनं हजेरी लावली.

पॅडमॅन या चित्रपटाच्या निमित्तानं महिला पोलीस कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींशी त्यांना मुक्त संवाद साधवा. महिलांना येणाऱ्या मासिक पाळी आणि त्याबद्दल समाजात असणारे गैरसमज या बद्दल त्याने चर्चा केली. या चर्चेचं खास वैशिष्ट्य म्हणजे अक्षयकुमारने मराठीतून महिलांशी संवाद साधला.

या कार्यक्रमादरम्यान अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अक्षयकुमारला प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना अक्षयकुमारनं उत्तरंही दिली.

First published: February 24, 2018, 1:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading