मुंबई, 2 मे- 'फुलपाखरू' (Phulpakharu) आणि 'मन उडू उडू झालं'
(Man Udu Udu Zal) या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे
(Hruta Durgule) होय. अभिनेत्रीचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. इतकंच नव्हे तर सर्वात जास्त इन्स्टाग्राम फॉलोअर्स असणारी मराठी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. हा आकडा 2 मिलियनच्या पुढे गेला आहे. त्यामुळेच तिला महाराष्ट्राची क्रश असं म्हटलं जातं. आता हृता दुर्गुळेच्या चाहत्यांसाठी एक बॅड न्यूज आहे.
हृता दुर्गुळे आता 'मन उडू उडू झालं'
(hruta durgule quits man udu udu zal ) मालिकेत दिसणार नाही. तिनं मालिका सोडल्याचे समोर आलं आहे. ई टाईम्सनं याबाबत वृत्त दिलं आहे.
ई टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, हृताने 'मन उडू उडू झालं' ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेच्या निर्मात्यांसोबत तिचा काही कारणावरुन वाद झाल्यामुळे तिने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, याविषयी हृताने मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
वाचा-
विराजस कुलकर्णी- शिवानी रांगोळेचा मेंदी समारंभाचा क्यूट Video आला समोर !
हृता आणि मालिकेच्या निर्मात्यांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. सेटवर अस्वच्छता असल्यामुळे हृता व निर्मात्यांमध्ये भांडण झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या दोघांमधील वाद विकोपाला गेल्यामुळे हृताने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु, मालिकेत काम करण्यापूर्वी हृताने केलेल्या करारानुसार, तिला एक महिन्याचा नोटीस पिरिअड पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतरच तिला ही मालिका सोडता येईल. चाहते मात्र नाराज झाले आहेत. हृतानं मात्र यावर कोणतचं अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही.
वाचा-
'जन्माला आल्यावर पोलिओचा DOSE आणि फोटोशूट करतांना...' संकर्षणची पोस्ट चर्चेत
सोशल मीडियावर सध्या मात्र विविधचर्चा रंगल्या आहे. हृतानं लग्नासाठी मालिका सोडल्याची चर्चा रंगली आहे. तर काहींच्या मते तिला सिनेमा मिळाल्यानं हा निर्णय घेतला आहे. असं जरी असलं तरी हृता या सगळ्या चर्चांवर काय बोलणार याची देखील सर्वांना उत्सुकता लागली आहे. मालिकेतील इंद्रा आणि दिपूची आवडती जोडी आहे. यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना देखील खूप आवडते. त्यामुळे हृताने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर हृताची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या हृताने मास मीडिया या पदवी अभ्यासक्रमातील जाहिरात क्षेत्रात शिक्षण घेतलं आहे. हृता दुर्गुळे 'दुर्वा' या मालिकेतून सर्वांसमोर आली होती. या मालिकेनं जवळपास हजार भागांचा टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर ती 'फुलपाखरू' मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. या मालिकेपासून तरुणाईमध्ये तिची प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती. लवकरची ती बॉयफ्रेंड प्रतिक शाह याच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. 24 डिसेंबरला या दोघांचा साखरपुडा झाला आहे. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसोबत रोमॅंटिक फोटो शेअर करत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.